मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अल्पवयीन मुलीवर 16 जणांकडून बलात्कार, शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली असता गाठलं नराधमांनी

अल्पवयीन मुलीवर 16 जणांकडून बलात्कार, शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली असता गाठलं नराधमांनी

आरोपी अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर ...

आरोपी अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर ...

जोधपूरमध्ये 12 वर्षीय अल्पवयीन (Jodhpur Minor Girl Rape) मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आता भरतपूरमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत (Bharatpur Minor Gang Rape) 16 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

राजस्थान, 15 फेब्रुवारी: राजस्थानमध्ये (Crime in Rajasthan)अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. जोधपूरमध्ये 12 वर्षीय अल्पवयीन (Jodhpur Minor Girl Rape) मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आता भरतपूरमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत (Bharatpur Minor Gang Rape) 16 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला.

पीडित मुलीनं नातेवाईकांना सांगितलं की, एकानं तिचा चेहरा दाबला आणि दुसऱ्यानं तिला चाकूचा धाक दाखवून तिचं अपहरण केलं. यानंतर आणखी काही लोकही आले आणि त्यांनी निष्पाप मुलीवर बलात्कार केला. यानंतर कुटुंबीयांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यानंतर मुलीचं मेडिकल करण्यात आलं आहे.

भावासोबत कपडे खरेदीसाठी गेलेल्या बहिणीचा करुण अंत; रस्त्यावर आपटून गेला जीव, मनाला चटका लावणारी घटना 

ही घटना भरतपूरच्या खोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी 11 फेब्रुवारी रोजी जंगलात शेळ्यांना चारण्यासाठी घेऊन गेली होती. मुलगी घरी न परतल्याने वडिलांनी आजूबाजूला शोधाशोध सुरु केली.

12 फेब्रुवारी रोजी वडिलांनी बेपत्ता मुलीची नोंद करण्यासाठी त्यांनी खोह पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी मुलगी घरी परतल्याचं आढळून आलं. मुलीने घरी परत आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना घडलेली सर्व घटना सांगितली. यानंतर वडिलांनी 13 फेब्रुवारीला गँगरेपची तक्रार दाखल केली.

12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

याआधी जोधपूर जिल्ह्यातून 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीसोबत घडलेली ही घटना शनिवारी दुपारची असल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईनं पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीलाही अटक केली आहे. ही घटना जोधपूरमधील मंडोर पोलीस स्टेशन परिसरातली आहे.

First published:

Tags: Gang Rape, Rajasthan