मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /संतापजनक! चॉकलेटचं आमिष दाखवून सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

संतापजनक! चॉकलेटचं आमिष दाखवून सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

सहा वर्षांच्या चिमुरडीवर चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणातला आरोपी या चिमुरडीचा शेजारी (Neighbour) होता.

सहा वर्षांच्या चिमुरडीवर चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणातला आरोपी या चिमुरडीचा शेजारी (Neighbour) होता.

सहा वर्षांच्या चिमुरडीवर चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणातला आरोपी या चिमुरडीचा शेजारी (Neighbour) होता.

बिकानेर, (राजस्थान) 8 जानेवारी : सहा वर्षांच्या चिमुरडीवर चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणातला आरोपी या चिमुरडीचा शेजारी (Neighbour) होता. पोलिसांनी  आरोपीला अटक केली आहे. तर पीडित चिमुरडीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

काय आहे घटना?

माणुसकीला काळिमा फासणारी आणि प्रत्येकाला संताप करायला लावणारी ही घटना राजस्थानमघील (Rajasthan) बिकानेर (Bikaner) मधील नयाशहर या भागात घडली आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी या प्रकरणातल्या आरोपीनं तिला चॉकलेटचं आमिष दाखवून घरामध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले.

CCTV फुटेजमुळे लागला छडा

या प्रकरणाची माहिती दुसऱ्या दिवशी समजताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. त्यांनी रामपुरा बायपासवर आंदोलन केलं. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत जवळपास अर्धा डझन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. तरीही त्यांना कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या घरासमोरील CCTV फुटेज पोलिसांनी तपासलं. या फुटेजमध्ये ती चिमुरडी तरुणासोबत जाताना दिसली. या पुराव्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

(हे वाचा-ग्राहक बनून आले आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले, LIVE VIDEO)

" isDesktop="true" id="511948" >

महिलांमध्ये दहशतीचं वातावरण!

बिकानेरमधील ज्या नया शहर भागात ही घटना घडली तिथं काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. रोज संध्याकाळी हा परिसर गर्दुल्ल्यांचा अड्डा होत आहे. त्यामुळे महिलांना संध्याकाळी घराबाहेर फिरणंही अवघड झालं आहे.  याबाबत पोलिसांमध्ये वारंवार तक्रार करुनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच या चिमुरडीवर ही दुर्दैवी वेळ आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime, Pune crime news