बाईकस्वारानं फरपटत नेलं म्हणून महिला कॉन्स्टेबलनं केली बेदम मारहाण, VIDEO VIRAL

बाईकस्वारानं फरपटत नेलं म्हणून महिला कॉन्स्टेबलनं केली बेदम मारहाण, VIDEO VIRAL

महिला पोलीस कॉन्स्टेबलने दुचाकीवरुन ट्रिपलसीट जाणाऱ्या तरुणांना अडवल्यानं घडला प्रकार.

  • Share this:

नागौर, 10 नोव्हेंबर : एका दुचाकीवरून जाणाऱ्या 3 तरुणांना महिला पोलीस कॉन्स्टेबलनं रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणांनी दुचाकीचा स्पीड वाढवून कॉन्स्टेबलला काही अंतरापर्यंत फरपटत नेल्याचा प्रकार घडला. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी उलटली. यावेळी महिला कॉन्स्टेबलने आपला जीव वाचवला बदमाश तरुणांच्या कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार भर रस्त्यात सुरू असल्यानं नेमकं काय घडतंय हे पाहण्यासाठी गर्दी जमा झाली.

नेमकं काय घडलं?

ही घटना बुधवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. एका दुचाकीवरून तीन जण जात असताना रस्त्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं आणि दुचाकीस्वाराची मान धरणार इतक्यात त्याने गाडीचा स्पीड वाढवला आणि दुचाकीसोबत महिला कॉन्स्टेबल फरपटत गेली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दुचाकी उलटली आणि अपघात झाला. सुदैवानं यामध्ये कोणी गंभीर जखमी झालं नाही. महिला कॉन्स्टेबलने जीव वाचवत आरोपीच्या एकामागोमाग एक कानशिलात लगावल्या.

महिला पोलीस कॉन्स्टेबलने कानशीलात लगावली आणि झाला राडा

महिला पोलीस कॉन्स्टेबलने कानशिलात लगावताच तरुणांनी धिंगाणा करण्यास सुरुवात केली. महिलेनं तरुणांना बेदम मारहाण केल्याचा आरोपही स्थानिकांनी लावला आहे. तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ पोलिसांची दबंगरी दाखवण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केला. जर दुचाकी स्लीप झाली नसती तर तरुणांनी महिला कॉन्स्टेंबलला फरपटत नेलं असत आणि फरार झाले असते.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलने तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 11:45 AM IST

ताज्या बातम्या