OMG! 21 वर्षांनंतर हुंडा परत देण्यासाठी आला माजी सैनिका आणि घातल्या 4 जणांना गोळ्या

OMG! 21 वर्षांनंतर हुंडा परत देण्यासाठी आला माजी सैनिका आणि घातल्या 4 जणांना गोळ्या

हुंड्यावरून कोर्टात सुरू असलेल्या केसचे पडसाद, हुंडा देण्यासाठी माजी सैनिकाचं धक्कादायक कृत्य.

  • Share this:

जोधपूर, 12 नोव्हेंबर: निवृत्त सैनिकाने शाळेत गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील सिलारी गावात हा प्रकार घडला. निवृत्त सैनिक अधिकारी ओमाराम जाट यांच्यावर हुंड्याप्रकरणी कोर्टात केस सुरू होती. त्यांनी आपल्या साथीदारांना घेऊन एका टॅक्सीवर फलक लावला. ओमाराम जाट हे तब्बल 21 वर्षांनंतर एका टॅक्सीवर आपल्या पत्नीचा फोटो आणि हुंडा परत करण्याचं बॅनर लावून सासरवाडीत आला होता. त्यावेळी अचान समोर असलेल्या सरकारी शाळेत घुसून त्यांनी राडा घातला. टॅक्सीत हुंड्यावेळी दिलेलं सामान होतं. बॅनरवर 'विद्या जाटणी सुपुत्री मंगलाराम परासरिया' असं लिहिलं होतं. हुंडा परत देण्यास किंवा कुणाला त्याबाबत काही तक्रार असल्यास मोबाईल नंबरही देण्यात आला होता. ओमाराम यांनी एका सरकारी शाळेत घुसखोरी केली आणि तिथे विद्यार्थ्यांना लग्न न करण्याचे उपदेश देऊ लागले. लग्न करण्यामुळे काय होतं याबाबतही ते भाषण देऊ लागले. हा सगळा तमाशा थांबवण्यासाठी तिथे काही लोक आले. त्यामध्ये ओमाराम यांच्या सारचे उपस्थित होते. त्यांच्या रागाचा पारा चढला आणि बंदुकीतून 4 गोळ्या सुटल्या. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

मेहुण्याला लागली गोळी, सासऱ्यानं केला गुन्हा दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 11 वाजता ओमाराम सिलारी गावातील शाळेत जबरदस्ती घुसले. त्यांनी हुंडा घेणं पाप आहे अशा घोषणा दिल्या आणि जोरजोरात भाषण सुरू केलं. सुरू असलेला तमाशा थांबवण्यासाठी चार ते पाच लोक घटनास्थळी दाखल झाले. ओमाराम यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि फरार झाले. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन मेहुण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी ओमाराज यांच्या सासऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅक्सीवरील बॅनर, हुंड्यासाठी लढा आणि वाज

माजी सैनिक आणि त्याच्या सासरच्यांमध्ये हुंड्यावरून वाद झाला होता. त्यासंदर्भात कोर्टात केस सुरू होती. बुधवारी आरोपीने त्यांच्या साथीदारांसोबत टॅक्सीवर हुंडा घेणं महापाप असं सांगणारं पोस्टर लावलं. या पोस्टरवर आपल्या पत्नीचा मोठा फोटो आणि मोबाईलनंबरही दिला होता. पत्नीच्या घरच्यांनी हा सगळा प्रकार पाहून वादाला तोंड फोडले. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्याभरात माजी सैनिक अधिकाऱ्यानं गोळीबार केला. गोळीबारानंतर अधिकारी फरार असून सासरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीवरुन आरोपीचा तपास सुरू आहे.

SPECIAL REPORT: सत्ता स्थापनेवरुन नेटिझन्सनी शिवसेनेला केलं ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Published by: Kranti Kanetkar
First published: November 12, 2019, 1:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading