मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आता तो कधीच परत शाळेत नाही येणार, पाण्याला हात लावला म्हणून टीचरने दिली 'मौत' की शिक्षा

आता तो कधीच परत शाळेत नाही येणार, पाण्याला हात लावला म्हणून टीचरने दिली 'मौत' की शिक्षा

माठातील पिण्याच्या पाण्याला हात लावल्याने शिक्षकाने मुलाला जीवघेणी मारहाण केली. यामध्ये मुलाच्या कानाची नस फाटली. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    जलोर : असं म्हणतात की कोणी पाणी मागितलं तर ते द्यावं पुण्यं लाभतं. पिण्याच्या पाण्याला कधी नाही म्हणू नये. जिथे शाळे समानतेचे धडे गिरवायला हवेत तिथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पिण्याच्या पाण्याला हात लावला म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. माठातील पिण्याच्या पाण्याला हात लावल्याने शिक्षकाने मुलाला जीवघेणी मारहाण केली. यामध्ये मुलाच्या कानाची नस फाटली. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. या मुलाची चूक एवढीच की तो मुलगा दलित होता. या घटनेनंतर दलित संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. राजस्थान सरकारने मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे. तर सुरक्षेच्या कारणामुळे या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असं आश्वासन गहलोत सरकारने दिलं आहे. VIDEO: 90 सेकंदात रिक्षाचालकाला 17 वेळा कानशिलात लगावल्या; महिलेची क्रूरता पाहून येईल संताप देशात स्वातंत्र्यदिनाची तयारी जल्लोषात सुरू आहे. मात्र जलोर जिल्ह्यातील या घटनेनं पुन्हा एकदा वास्तव समोर आणलं आहे. जातीयवादाचं हे वास्तव भीषण आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Crime news, Rajasthan

    पुढील बातम्या