विचित्रच आहे...खरा मालक शोधण्यासाठी म्हशीची झाली DNA टेस्ट!

विचित्रच आहे...खरा मालक शोधण्यासाठी म्हशीची झाली DNA टेस्ट!

कौटुंबीक वाद (Family Dispute) आणि गुन्हे (Crime) यांची उकल करण्यासाठी अनेकदा DNA रिपोर्टची मदत घेतली जाते. राजस्थानात म्हशीचा (Buffalo) खरा मालक ठरवण्यासाठी चक्क वादग्रस्त म्हशीची DNA टेस्ट घेण्यात आली आहे.

  • Share this:

नागौर, 5 डिसेंबर:  एखाद्या मुलाच्या पालकांची ओळख सिद्ध करण्यासाठी, आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांना आणि कोर्टाला DNA टेस्टची मदत होते. वारसाहक्क, संपत्तीचे वाद, मानवी गुन्हे यांची उकल करण्यासाठी DNA टेस्टची तपास यंत्रणांना (Investigative agencies) मोठी मदत झाली आहे.

राजस्थानमध्ये (Rajsthan) देखील एका अशाच वादामध्ये DNA टेस्ट घेतली गेली.  मात्र, या ठिकाणी मुलांचा आणि पालकांचा वाद नाही. कोणता खून, बलात्काराचाही गुन्हा नाही. तर एका म्हशीच्या दोन मालकांमधील वाद सोडवण्यासाठी चक्क त्या वादग्रस्त म्हशीचीच  DNA टेस्ट घेण्यात आली आहे. एखाद्या म्हशीसाठी DNA टेस्ट घेण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार आहे.

काय आहे प्रकरण?

नागौर जिल्ह्यातील पुसाराम मेघवाल हा या प्रकरणातील मुळ तक्रारदार आहे. पुसाराम हा रेखाराम जाट यांच्याकडे कामाला आहे. 24 ऑगस्ट 2020 रोजी पुसारामने एका शेतामध्ये तीन वर्षांच्या एका म्हशीला चारा खाण्यासाठी सोडले होते. म्हैस संध्याकाळी न परतल्याने पुसारामने म्हशीचा शोध घेतला. त्यावेळी त्याला ती एका ठिकाणी चारा करताना दिसली. पुसाराम म्हशीला घरी घेऊन जात असताना त्याला केशाराम जाट यांनी रोखले.  या दोन पक्षांमध्ये त्या दिवसापासून म्हशीच्या मालकी हक्काचा वाद सुरु आहे.

हे वाचा-संतापलेला हत्ती माणसांवर हल्ला करत विहिरीवर पोहोचला आणि...

आमच्या म्हशीला जाट परिवाराने जबरदस्तीने जप्त केले आहे, अशी तक्रार पुसारामचे वडील हिम्मतराम यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणात जाट परिवाराने काही माणसांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोपही हिम्मतरामने केला आहे. जाट परिवाराने मात्र ती म्हैस आपल्याच मालकीची असल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनी दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचा तीनदा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. दोन्ही गटांमध्ये वाद कायम असल्याने पोलिसांनी वादग्रस्त म्हशीची DNA टेस्ट घेतली आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात गरज पडली तर म्हशीच्या आईचीही DNA टेस्ट घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या ती वादग्रस्त म्हैस कटीया गावात असून या प्रकरणात आठवडाभरात DNA रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. DNA रिपोर्टनंतरच म्हशीचा खरा मालक कोण याचा उलगडा होईल.

Published by: News18 Desk
First published: December 5, 2020, 12:42 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या