धक्कादायक! धाकट्या बहिणीनेच गोळी झाडून केली मोठ्या बहिणीची हत्या,जेवणावरून झाला होता वाद

धक्कादायक! धाकट्या बहिणीनेच गोळी झाडून केली मोठ्या बहिणीची हत्या,जेवणावरून झाला होता वाद

गुन्हेगारी पार्श्वभूमी (Criminal background) असलेल्या दोन बहिणींमध्ये जेवणाच्या वेळी शुल्लक कारणांमुळे वाद झाला. या वादात लहान बहिणीनं मोठ्या बहिणीची गोळी झाडून हत्या केली आहे.

  • Share this:

बांसवाडा (राजस्थान), 18 डिसेंबर:  गुन्हेगारी पार्श्वभूमी (Criminal background) असलेल्या दोन बहिणींमध्ये जेवणाच्या वेळी शुल्लक कारणांमुळे वाद झाला. या वादात लहान बहिणीनं मोठ्या बहिणीची गोळी झाडून हत्या केली आहे. राजस्थान (Rajasthan) मधील बांसवाडा याठिकाणी हा प्रकार घडला. कायनात असं या प्रकरणातल्या आरोपी लहान बहिणीचं नाव असून तिने झिनत या मोठ्या बहिणीची हत्या केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या दोन्ही बहिणी काही दिवसांपासून फरार होत्या. घरी परतल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मेजवानी देण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या वादातून कायनातनं मोठ्या बहिणीची हत्या केली.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

कायनातच्या कुटुंबीयांनी या हत्येनंतर तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या व्यक्तींनी जुन्या वादातून गोळी झाडल्याचा आरोप तिच्या लहान बहिणीनं केला होता. झिनतवर एका व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. तर, कायनतच्या विरुद्ध एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

(हे वाचा-धक्कादायक! पत्नीची हत्या करुन माजी पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या)

या दोन्ही बहिणी काही दिवसांपासून फरार होत्या. त्या गुरुवारी रात्रीच घरी परतल्या आणि काही तासांमध्येच हा सर्व प्रकार घडला.

कोणत्या कारणांमुळे लागला छडा?

बाहेरच्या दोन व्यक्तींनी गोळी झाडल्याचा आरोप घरातील मंडळींनी केला होता. मात्र ही घटना घडली तेंव्हा घरातील मोजकीच मंडळी उपस्थित होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या परिसराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील कोणतीही बाहेरची व्यक्ती त्यांच्या घरी जात असल्याचं आढळलं नाही. इतकच नाही तर या प्रकरणात कुटुंबीयांनी पोलिसांना कळवण्यासही टाळाटाळ केली होती. घरातील मंडळी झिनतला उपचारासाठी उदयपूरला घेऊन गेले होते. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घराचं कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश केला.

(हे वाचा-सावधान! Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या विदेशी नागरिकाला अटक)

या घटनेनंतर मुख्य आरोपी कायनात फरार आहे. ‘कायनात अनेक दिवसांपासून घरी आलीच नाही, पोलीस आम्हाला विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप तिच्या लहान बहिणीनं केला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 18, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या