महिलेला अडवून केला गँगरेप, पुतण्यालाही करायला लावले अत्याचार ; VIDEO केला व्हायरल

महिलेला अडवून केला गँगरेप, पुतण्यालाही करायला लावले अत्याचार ; VIDEO केला व्हायरल

आपल्या भावाला पैसे देऊन पीडित महिला आपल्या पुतण्यासह गावी परत येत होती. तेव्हा 6-7 लोकांनी या महिलेला अडवले.

  • Share this:

राजस्थान, 19 सप्टेंबर : राजस्थानमधील अलवरमध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अलवरमध्ये एका एका महिलेला पुतण्यासह 42 वर्षीय महिलेला ओलीस ठेवून महिलेवर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केल्याची घटना समोर आली.

राजस्थानमध्ये असलेल्या अलवर जिल्ह्यातील तिजारा भागात ही घटना घडली. आपल्या भावाला पैसे देऊन पीडित महिला आपल्या पुतण्यासह गावी परत येत होती. तेव्हा  6-7 लोकांनी या महिलेला अडवले. त्यानंतर एक एक करून सामूहिक अत्याचार केला. या टोळक्याने तिच्या पुतण्याला बांधून ठेवले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. आपल्या कृत्याची कुठे वाच्यात होऊ नये म्हणून या टोळक्याने पीडितेच्या पुतण्याचाही व्हिडिओ तयार केला.

आई-बापानं 14 व्या वर्षी लावलं होतं लग्न, तरुणीने 21 दिवसांतच केली आत्महत्या

या घटनेनंतर पीडितेनं 17 सप्टेंबर रोजी तिजारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 मुख्य आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी धूता उर्फ आसम आणि सहुदला बेड्या ठोकल्या आहे. पीडितेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली होती. पीडितेनं जबाब दिला की, भावाला पैसे देऊन परत घरी येत असताना या टोळक्याने जबरदस्तीने अत्याचार केला.

हरियाणामध्ये केला व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, तिजाराचे डीएसपी कुशाल सिंह यांनी सांगितले की,  'शेखपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात राहणारी पीडित विवाहित महिला 14 सप्टेंबर रोजी आपल्या पुतण्यासह दुचारीवरून हरियाणा येथील कंसाली गावात आपल्या नातेवाईकाचे दहा हजार रुपये देऊन गावाकडे परतत होती. वाटेत तिजारा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात डोंगराचा भाग येतो. या भागातून जात असताना  तलवार, कुऱ्हाडीसह  6- 7 तरुणांनी जबरदस्तीने त्यांना थांबवले. पुतण्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचे हात पाय बांधून ठेवले. त्यानंतर या टोळक्याने जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केला. या तिजारा भागात राहणाऱ्या आरोपी धूता उर्फ आसमने जबरदस्तीने पीडितेसोबत अत्याचार केले. तर इतर तरुणानी पीडितेच्या पुतण्याला नग्न करून त्यालाही पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाही व्हिडिओ तयार करून व्हायरल केला.'

'त्यानंतर हरियाणा गावात पीडितेचा व्हिडिओ व्हायरल केला. आपला जीव वाचवून पीडित घऱी पोहोचली आणि सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर कुटुंबाची मानहानी होईल या भीती पोटी तक्रार दाखल केली नाही. पण व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजत या कुटुंबाला मोठा हादरा बसला. त्यानंतर पोलिसांनीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

Published by: sachin Salve
First published: September 19, 2020, 9:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या