राघवेंद्र साहू, रायपूर, 28 नोव्हेंबर: पत्नीचे पैसे स्वत:चे समजून खर्च करणाऱ्या पतीला त्याचं हे कृत्य महागात पडलं आहे. या पत्नीने तिच्या नवऱ्याविरोधात FIR दाखल केली आहे. छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूर (Raipur) याठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणात रायपूरमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डचा गैरवापर आणि लाखो रुपये खर्च केल्याबद्दल पत्नीने पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
टाटीबंध परिसरातील सर्वोदयनगर येथे राहणाऱ्या अंकित सिंह राठोडने आमनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिचा नवरा विजय विक्रमसिंह राठोडने त्याच्या कंपनीच्या कामासाठी अंकितच्या एसबीआय (SBI Bank) आणि एचएडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्डचा वापर करून 3 लाख 75 हजार रुपये खर्च केले, अशी तक्रार केली आहे.
पत्नीने तिचं क्रेडिट कार्ड बिल भरण्यास सांगितले तेव्हा पतीने पैसे जमा केले नाहीत. याबाबत दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पतीने केलेल्या या कृत्याविरोधात पत्नीने तक्रार दाखल केली आहे. विजय विक्रमसिंग राठोडकडेच त्याच्या पत्नीचं क्रेडिट कार्ड होतं. विक्रम सिंह वंदना ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत पीआरओ म्हणून काम करत होता. या कंपनीचे एअर तिकिट बुक करण्यासह इतर कामांसाठी तो पत्नीच्या क्रेडिट कार्डचा वापर करत असे आणि कंपनीने पैसे दिल्यावर क्रेडिट कार्ड बिल भरत असे.
(हे वाचा-सजून-धजून घेतले सात फेरे;पण मध्यरात्री प्रियकरासोबत पळून गेली नववधू, त्यानंतर...)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी 3 लाख 75 हजार रुपये क्रेडिट कार्डची रक्कम भरायची होती, पण ती त्याने भरली नाही आणि पत्नीबरोबरचा वाद विकोपास गेला. तिने थेट पोलीस ठाणे गाठले. एसएचओने त्या दोघांनाही हे प्रकरण आपापसात मिटवण्याचा सल्ला दिला होता. पण पत्नी अंकितसिंग राठोड याविषयी सहमत झाली नाही आणि तिने पतीविरोधात कलम 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अमानका पोलीस स्टेशनचे प्रभारी भरत बरेथ यांचे म्हणणे आहे की तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविला गेला असून तपास केला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news