संतोष कुमार गुप्ता (रसूलपूर), 26 मार्च : रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार विरोधात रेल्वे पोलिसांनी तिकीटांची दलाली करणाऱ्याला पकडले आहे. मागच्या तीन वर्षात त्याने 1 कोटींहून अधिक किमतीच्या बेकायदेशीर तिकिटांचा व्यापार केला असल्याचे उघड झाले आहे.
हा दलाल 30 हून अधिक वेगवेगळ्या लोकांचे आयडी तयार करून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकिटे काढत असल्याचे समोर आले आहे. तात्काळ तिकीट काढण्यासाठी त्याने चुकीच्या सॉफ्टवेअरचा त्याने वापर केला आहे. त्यामुळे त्याच्याकडे बोगस तिकीट घेण्यासाठी मोठी रांग लागायची. तो छप्रा आणि सिवान जिल्ह्यातील लोकांचा वापर करून तो बोगस तिकीट काढायचा.
मुलांच्या वादात घरातल्या लोकांची उडी, दिराचं वहिनीसोबत भयानक कांड
रसूलपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात या तिकीट दलालाची चर्चा इतकी होती की, रेल्वे स्थानकाऐवजी येथे तिकीट काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागयच्या. त्याच्या छोट्याशा दुकानातून तत्काळ तिकिटे बिनदिक्कतपणे बनवली जात होती, याची माहिती रेल्वे विभागाला मिळाली. यातून रेल्वे अधिकाऱ्यांनी सापळा रचून या तिकीट दलाल पकडला आणि त्याच्याकडून अनेकांची रेल्वे तिकिटेही जप्त करण्यात आली.
रेल्वेचे अधिकारी प्रभारी मुकेश कुमार सिंह म्हणाले की, रसूलपूरच्या चैनपूर रोडवर बेकायदेशीरपणे तिकीट काढण्याचा धंदा सुरू होता. मुख्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रसुलपूर बाजार, चैनपूर रोड, रसूलपूर येथे KGN सायबर कॅफे आणि प्रिंटिंग प्रेस ऑनलाइन सेंटर नावाच्या दुकानाविषयी माहिती मिळाली.
बदली झाली, पण ती मान्य नव्हती, महिलेने तणावात येऊन उचललं भयानक पाऊल
याची माहिती रेल्वेला मिळताच त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला आणि सायबर कॅफेचालक मोह. मुमताज आलमला अटक करण्यात आली. मुमताज आलम विविध वैयक्तिक आयआरसीटीसी आयडी आणि रेल्वेची ई-तिकीटे गरजू ग्राहकांना भाड्यातून प्रति व्यक्ती 250-300 रुपये अतिरिक्त आकारून फसवणूक करत होता दरम्यान पोलिसांनी याचा भांडाफोड केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.