Home /News /crime /

क्रूरतेचा कळस! रेल्वे कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हात-पाय बांधून फेकलं झुडपात

क्रूरतेचा कळस! रेल्वे कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हात-पाय बांधून फेकलं झुडपात

एका अल्पवयीन मुलीवर रेल्वे कर्मचाऱ्यानं (Railway Employee) अमानुष पद्धतीनं बलात्कार (Raped on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम रेल्वे कर्मचाऱ्यानं बलात्कार केल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीचे हात पाय बांधून तिला एका झुडुपात (accused threw victim in shrub) टाकून दिलं होतं.

पुढे वाचा ...
    देवरिया, 21 मार्च: एका अल्पवयीन मुलीवर रेल्वे कर्मचाऱ्यानं (Railway Employee) अमानुष पद्धतीनं बलात्कार (Raped on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम रेल्वे कर्मचाऱ्यानं बलात्कार केल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीचे हात पाय बांधून तिला एका झुडुपात (accused threw victim in shrub) टाकून दिलं होतं. रविवारी सकाळी दुर्दैवी अवस्थेत मुलगी सापडल्यानंतर पीडितेच्या परिवाराला धक्काच बसला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना देवरियाच्या भटनी रेल्वे स्टेशन परिसरात घडली. शनिवारी रात्री आरोपीनं रेल्वे विभागाच्या विश्रामगृहात अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं आहे. त्यानंतर त्याने पीडित मुलीचे हात पाय बांधून तिला जवळच्या एका झाडीत टाकून दिलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या सांगण्यावरून रेल्वे कर्मचारी ट्रॉली मॅन संतोष कुमार यादव विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, भटनी जंक्शनच्या दक्षिण रेल्वे कॉलनीत एक रेल्वे कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो. त्यांच्याकडे रेल्वे विश्रामगृहाच्या चाव्या देखील असतात. पीडित मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, ट्रॉली मॅन संतोष कुमार यादव कुटुंबीयांकडून चावी घेऊन विश्रामगृहात आरामासाठी गेला होता. त्यानंतर आरोपी रेल्वे कर्मचाऱ्यानं रात्री उशीरा अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर फोन करून तिला पाणी मागितलं. अल्पवयीन मुलगी आरोपीला पाणी देण्यासाठी गेली असता, आरोपीनं तिच्यावर रेल्वे विश्रामगृहातच बलात्कार केला. हे ही वाचा -विकृत! पतीचं घृणास्पद कृत्य; पत्नीचं प्रायव्हेट पार्ट तांब्याच्या तारेनं शिवलं रात्री एकच्या सुमारास पीडितेच्या आईनं पाहिलं की, मुलगी अंथरूणावर नाहीये. त्यामुळे तिने काही लोकांच्या मदतीनं मुलीला आसपास शोधण्याचा प्रयत्न केला. पण मुलगी काही सापडली नाही. त्यामुळे पीडितेच्या आईनं रात्री उशीरा पोलीस स्थानकात जावून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. शिवाय सकाळी तक्रार द्यायला या, असंही पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर अस्वस्थ होऊन पीडितेच्या आईला परत यावं लागलं. रविवारी सकाळी मुलगी जेव्हा आक्षेपार्ह अवस्थेत झाडीमध्ये सापडली, तेव्हा परिवाराला धक्काच बसला. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून संबंधित आरोपी कर्मचाऱ्याला अटक केलं आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rape news, Uttar pardesh

    पुढील बातम्या