• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • रेल्वे कर्मचाऱ्याने आईची हत्या करून घरातचं जाळलं; त्यानंतर उचललं धक्कादायक पाऊल

रेल्वे कर्मचाऱ्याने आईची हत्या करून घरातचं जाळलं; त्यानंतर उचललं धक्कादायक पाऊल

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  हरयाणा, 13 नोव्हेंबर : हरयाणाताली (Haryana News) जिंदमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने शनिवारी वयस्कर आईची हत्या (Murder) केल्यानंतर घर जाळल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. यानंतर व्यक्तीने स्वत: रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (Killed Mother) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्याने धारदार शस्त्राने आपल्या आईवर वार केले आणि त्यानंतर घराला आग लावून फरार झाला. रेल्वे चौकीचे प्रभारी चरण सिंग यांनी सांगितलं की, सकाळी मोहलखेडा गावाजवळ एका तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तो रेल्वेच्या डी ग्रुपमध्ये काम करीत होता. त्याच्यावर आपल्या आईची हत्या करण्याचा आरोप आहे. दोन्ही मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. रेल्वे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Railway employee kills mother burns house Then he took a shocking step) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कॉलनीत राहणारा अजय (32) याने शनिवारी सकाळी आपल्या क्वार्टरमध्ये वयस्कर आई माया देवी (65) यांचा कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि त्यानंतर घराला आग लावली. घरातून आगीच्या ज्वाळा पाहून शेजारच्यांनी फायर ब्रिगेडला याबाबत माहिती दिली. हे ही वाचा-पत्नीने दिला त्रास; त्रस्त पतीने उचललं भयावह पाऊल,24 तासात 3 वेळा केलं असं कृत्य आग विझवित असताना माया देवी हिची हत्या झाल्याचा खुलासा झाला. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजयने जयपूरहून चंदीगडला जाणाऱ्या ट्रेनच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. सांगितलं जात आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून अजय मानसिक दृष्ट्या आजारी होता. तो कामावर देखील जात नव्हता. अजय रेल्वेमध्येच डी ग्रुपमध्ये काम करीत होता. मानसित तणावातून त्याने हे भयावर पाऊल उचललं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: