मजुराचं शारीरिक शोषण करायचा मालक, धारदार शस्त्रानं शरीराचे केले 3 तुकडे

मजुराचं शारीरिक शोषण करायचा मालक, धारदार शस्त्रानं शरीराचे केले 3 तुकडे

दोन दिवसांपूर्वी झालेल्या हत्याकांड प्रकरणाचा गुंता अखेर पोलिसांना सोडवला आहे. मजुरानंच आपल्या मालकाची निर्घृण हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

  • Share this:

रायपूर, 22 ऑक्टोबर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या हत्याकांड प्रकरणाचा गुंता अखेर पोलिसांना सोडवला आहे. मजुरानंच आपल्या मालकाची निर्घृण हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. संदीप सिंह असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो गेल्या दोन वर्षांपासून आपल्याच मजुराचं शारीरिक शोषण करत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. शंकर कुमार पासवान असं आरोपीचं नाव आहे. गेल्या शुक्रवारीदेखील दारूच्या नशेत असताना संदीपनं मजुरासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मालकाकडून सातत्यानं होणाऱ्या बळजबरीला कंटाळून अखेर मजुरानं त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील रायगड येथे घडली आहे.

(वाचा : BSP नेत्याच्या तोंडाला काळं फासून काढली गाढवावरून धिंड, VIDEO VIRAL)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मानसरोवर धरण परिसरात डोकं नसलेला मृतदेह सापडला होता. यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दोन दिवसांच्या आतच पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला. पोलिसांनुसार संदीप सिंह होमोसेक्स्युअल होता आणि तो शंकर कुमार पासवानसोबत शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करत होता. त्याच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून पासवाननं आपल्या मालकाची हत्या केली.

(पाहा : 35 फूट उंचावरुन खाली पडला चिमुकला आणि... श्वास रोखून ठेवणारा पाहा VIDEO)

धारदार शस्त्रानं मालकाचा काढला काटा

एसपी संतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीपनं धारदार शस्त्रानं मालकाची हत्या केली. यानंतर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कॉल डिटेलच्या आधारे आरोपीचा शोध लावला. संदीपची हत्या होण्यापूर्वी तो आरोपी शंकरसोबतच असल्याचं तपासादरम्यान आढळून आलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आणि हत्याकांडाचा गुंता सुटला.

VIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या