लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक फरार, ACB ने असा रचला सापळा

लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक फरार, ACB ने असा रचला सापळा

ज्यांच्याकडे तपासाची जबाबदारी दिली होती, त्यांनीच नेमका हा प्रकार केला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 25 मार्च: रायगड जिल्ह्यातील (raigad) माणगाव पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गणेश कांदेकर याचा लाचलुचपत विभाग कसून शोध घेत आहे. गणेश कांदेकर याला 25 हजारांची लाच घेताना (bribe) रायगड लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. मात्र रिव्हॉल्वरचा धाक दाखवत आणि हवालदार गणेश मोरे याच्याशी झटापट करत त्याने घटनास्थळाहून पोबारा केला.

आर्थिक फसवणुकीबाबत तक्रारदाराने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. या बाबतचा तक्रार अर्ज माणगाव पोलीस ठाण्यात आला होता. या तपासासाठी वरिष्ठांनी ही जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक गणेश कांदेकर याच्यावर सोपवली. मात्र लाचखोर कांदेकर याने गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने 25 हजार रुपये कांदेकर याला दिल्यानंतर याबाबत त्यांनी लाचलुचपत विभागाला कळवलं. तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने माणगाव येथे तीन बत्ती नाका येथे सापळा रचला. मुंबई-गोवा महामार्गावरील फर्निचरच्या दुकानात पोलीस उपनिरीक्षक कांदेकर याने लाच स्वीकारल्याचं तक्रारदाराने खुणेद्वारे लाचलुचपत अधिकाऱ्यांना कळवलं. इशारा मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर झडप टाकली. मात्र कांदेकर याने शासकीय रिव्हॉल्वर बाहेर काढत धमकावलं. हा सर्व प्रकार सुरू असताना पोलीस हवालदार गणेश मोरे यांनी उडी मारुन त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कांदेकर बुलेटवरुन पळून जात असताना पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच बुलेटवरून पळून जात असताना हवालदार गणेश मोरे यांनी बुलेट पकडली. तेव्हा गणेश मोरे यांना लाचखोर कांदेकर याने 10 ते 12 फूट फरफटत नेले. त्यात पोलीस हवालदार गणेश मोरे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच लाचखोर कांदेकर याने घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

हे ही वाचा-गाड्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अटकेच्या भीतीने एकाची आत्महत्या

या घटनेनंतर गणेश कांदेकर विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदेकरला शोधण्यासाठी रायगड लाचलुचपत विभागाने वेगवेगळ्या टीम तयार करुन रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पुण्यात पाठवल्या आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: March 25, 2021, 10:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या