मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जवळच्याच माणसांकडून घात, जमिनीच्या वादातून भावकीत राडा, एकाला जबर मारहाण

जवळच्याच माणसांकडून घात, जमिनीच्या वादातून भावकीत राडा, एकाला जबर मारहाण

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

भावकीच्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Raigad, India
  • Published by:  Chetan Patil

प्रमोद पाटील, रायगड, 25 सप्टेंबर : आपले कुटुंबिय, नातेवाईक, भावंड आणि भावकी ही खरंतर आपली ताकद असते. ज्यांची जितकी मोठी भावकी तितकं गावात त्यांचं जास्त वजन मानलं जातं. आपल्या देशात नातेसंबंध जपायची एक परंपरा आहे. एकमेकांना मनाने घट्ट जोडून गुण्यागोविंदाने आयुष्य जगायचं, असा त्यामागचा विचार आहे. देशात वर्षानुवर्षांपासून माणूसकी जपली जातेय. पण हल्ली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यातील रासायनी येथे अशीच काहीशी घटना समोर आली आहे. भावकीच्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संबंधित घटना ही रायगड जिल्ह्यातील रासायनी येथे घडली आहे. सुधीर शेलार असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीत हक्क मिळविण्यासाठी वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. त्यांनी आपल्या नातेवाईकांना ही नोटीस पाठवली होती. याच नोटीशीचा राग मनात धरुन सुधीर यांना मारहाण केली. विशेष म्हणजे त्यांच्या भावकीतीलच काही व्यक्तींनी त्यांना नोटीशीचा जाब विचारत मारहाण केली. आरोपींनी सुधीर शेलार यांच्या घरात शिरुन मारहाण केली.

(गर्ल्स हॉस्टेलमधील व्हायरल MMS प्रकरणात धक्कादायक अपडेट; मास्टरमाईंड निघाला लष्करातला!)

आरोपींनी सुधीर शेलार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडसह दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे सुधीर शेलार हे गंभीर जखमी झाले. आरोपींनी सुधीर शेलार यांच्या दुकानातील काही सामानाची नासधूसही केली. या हाणामारीत शेलार जबर जखमी झाल्याने रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मारहाण करणारे आरोपी फरार झाले असून रसायनी पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी तात्काळ जखमी शेलार यांना उपचारासाठी पाठविले. शेलार त्यांना जबर मार बसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मारहाण करणारे तीन जणांसह अन्य आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार झाल्याची माहिती मिळाली असून त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published: