तरुणाने मुलीच्या वेशात येऊन वॉचमॅनचा कापला गळा, बारमध्ये सिगारेटचे दहा रुपये देण्यावरुन वाद

तरुणाने मुलीच्या वेशात येऊन वॉचमॅनचा कापला गळा, बारमध्ये सिगारेटचे दहा रुपये देण्यावरुन वाद

नशेत असलेला मयुरेश हा काही पैसे देत नव्हता. त्यांचं भांडण सुरु असतानाच वॉचमन असलेले दिलीप साळवी हे मध्ये पडले आणि त्यांनी मयुरेशला पैसे देण्यास सांगितले. याचा मयुरेशला राग आला होता.

  • Share this:

रत्नागिरी16 फेब्रुवारी : सिगारेटचे दहा रुपये देण्यावरुन झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी वॉटमनची हत्या केल्याची खळबळजन घटना घडलीय. एका बिअर शॉपीचा तो वॉचमन होता. वॉचमनचा गळा चिरणाऱ्या आरोपीचं धक्कादायक CCTV फुटेजही व्हायरल झालं आहे. ही घटना आहे महाड तालुक्यातलल्या दासगाव भागत घडलीय. यात दासगाव मधल्या लीना कळमकर यांच्या देशी दारु आणि बिअर शॉपीमध्ये वॉचमन म्हणून असलेल्या दिलीप साळवी यांची अशी निर्घृण हत्या करण्यत आली.

ही त्या करणाऱ्या मयुरेश पड्याळ या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय . विशेष म्हणजे हा आरोपी महिलेच्या वेशात आला होता आणि वॉचमन झोपेत असतानाच त्याने त्याचा गळा चिरला. घटनेच्या दिवशी मयुरेश हा बारमध्ये आला होता. त्याने दारु घेतली होती. नंतर त्याने सिगारेट घेतली. मात्र त्याचे पैसे तो देत नव्हता.

त्यातून त्याचं आणि मालकाचं भांडण झालं. नशेत असलेला मयुरेश हा काही पैसे देत नव्हता. त्यांचं भांडण सुरु असतानाच वॉचमन असलेले दिलीप साळवी हे मध्ये पडले आणि त्यांनी मयुरेशला पैसे देण्यास सांगितले. याचा मयुरेशला राग आला.

VIDEO महाराष्ट्रात भाजपने दिले स्वबळाचे संकेत, भाजप अध्यक्षांनी केली मोठी घोषणा

पहाटे अडीचच्या दरम्यान त्याने मुलीचा ड्रेस घातला होता. तोंडावर कापडही बांधलं होतं. बारच्या बाहेर साळवी झोपले होते. मयुरेश त्यांच्याजवळ आला आणि ते झोपेत असतानाच धार धार शस्त्राने त्याने साळवींचा गळा चिरला. या घटनेमुळे सर्व परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...

नाशिक दौरा रद्द करून शरद पवार मुंबईत , उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

कर्जबाजारीपणातून पिता-पूत्राची आत्महत्या, सूनेने घेतली सासू-सासऱ्यांची जबाबदारी

First published: February 16, 2020, 4:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या