मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बसचा पाठलाग करताना भीषण अपघात, डॉक्टरचा मृत्यू, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

बसचा पाठलाग करताना भीषण अपघात, डॉक्टरचा मृत्यू, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

अनियंत्रित वेगामुळे कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हवेत उडाल्याप्रमाणे कार दुभाजक तोडून पलिकडे गेली. या भीषण अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला.

अनियंत्रित वेगामुळे कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हवेत उडाल्याप्रमाणे कार दुभाजक तोडून पलिकडे गेली. या भीषण अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला.

अनियंत्रित वेगामुळे कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हवेत उडाल्याप्रमाणे कार दुभाजक तोडून पलिकडे गेली. या भीषण अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला.

  • Published by:  desk news

मदुराई, 21 डिसेंबर: सरकारी बसचा (Government Bus) पाठलाग (Chasing) करताना कारवरचं नियंत्रण (Lost control) सुटल्यामुळे एका डॉक्टरचा (Doctor) जागीच मृत्यू (Death on the spot) झाला. दुभाजक तोडून ही कार रस्त्याच्या (Broke divider) पलिकडे गेली आणि समोरून येणाऱ्या बससोबत 50 फूट फरफटत गेली. तमिळनाडूमधील मदुराईमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालं असून ते पाहिल्यावर अपघात किती भीषण होता, याची कल्पना येऊ शकेल.

अशी घडली घटना

मदुराईतील राजाजी सरकारी रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करणारे डॉ. कार्तिकेयन हे विकेंडनिमित्त मदुराईहून त्यांच्या मूळ गावी गेले होते. तिथून परत येत असताना एका सरकारी बसनं ओव्हरटेक करताना त्यांच्या कारचा आरसा मोडला. एवढं होऊनही बसचालकानं बस न थांबवता ती पुढेच रेटली. या प्रकारामुळे चिडलेल्या डॉ. कार्तिकेयन यांनी बसचा पाठलाग करून ती थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला. कार पाठलाग करत असल्याचं लक्षात आल्यावर बसचालकानं बसचा वेग वाढवला. तर बसला ओव्हरटेक करून थांबवण्याच्या प्रयत्नात डॉक्टर होते. एका ठिकाणी बसला ओव्हरटेक करत असताना प्रचंड वेगामुळे त्यांचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि रस्ता दुभाजक ओलांडून कार पलिकडे गेली.

बसने नेलं फरफटत

रस्ता दुभाजक तोडून पलिकडे गेलेली कार त्या बाजूने येणाऱ्या एका सरकारी बसला धडकली आणि 50 फूट फरफटत गेली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालं असून त्यातून या अपघाताची भीषणता लक्षात येऊ शकते. या अपघातात डॉ. कार्तिकेयन यांचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचा - YouTube Video पाहून टाकला जबरी दरोडा, पुरावा शोधताना पोलिसांचीही दमछाक

कुटुंबावर शोककळा

42 वर्षांच्या डॉ. कार्तिकेयन यांच्यामागे पत्नी, दोन मुलं आणि वडील असा परिवार आहे. या भीषण अपघातामुळे सर्वांनाच जबर मानसिक धक्का बसला आहे. गाडीत अडकल्यामुळे आणि अनेक ठिकाणी जबरी मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. गाडीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टेमसाठ पाठवण्यात आला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Accident, Cctv footage, Death, Tamil nadu