मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Whatsapp वर बुकिंग, फोटो पाहून ई-पेमेंट; ऑनलाइन सुरू होतं Sex Racket

Whatsapp वर बुकिंग, फोटो पाहून ई-पेमेंट; ऑनलाइन सुरू होतं Sex Racket

पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा फायदा घेत सेक्स रॅकेटला सुरू होता.

पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा फायदा घेत सेक्स रॅकेटला सुरू होता.

पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा फायदा घेत सेक्स रॅकेटला सुरू होता.

    लुधियाना (पंजाब), 24 जानेवारी :  पंजाब पोलिसांकडून (Punjab Police) होत असलेल्या दुर्लक्षाचा फायदा लुधियाना (Ludhiana) मधील सेक्स रॅकेटला (Sex racket) झाला आहे. सुरुवातीला काही गल्लींपुरत्या मर्यादीत असलेल्या या व्यवसायाचं स्वरुप आता अधिक संघटित झालं आहे. हा व्यवसाय करणारे अनेक गुन्हेगार देखील आता करोडपती झाले आहेत. कुठे होतो व्यवसाय? शहरातील अंधाऱ्या गल्लीत किंवा काही ठराविक लॉजवर होणाऱ्या या व्यवसायाचं स्वरुप आता बदललं आहे. आता मोठी लॉज तसंच फार्म हाऊसमध्ये हा व्यवसाय चालतो. काही शौकीन मंडळींनी यासाठी कायमच्या खोल्या हॉटेलमध्ये बुक केल्या आहेत. तसंच फार्म हाऊस देखील या कामासाठी भाड्यानं दिली जात आहेत.  याचबरोबर लुधियाना शहरातील अनेक छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये देखील हा व्यवसाय चालतो. काही दिवसांपूर्वी बस स्टँडजवळच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी एका रुममधून अनेक मुलींना ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी न जाता घटनास्थळावर सापडलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन हे प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप करण्यात येत आहे. हे ही वाचा-70 वर्षांच्या संसारानंतर कोरोनाही त्यांच्यात अंतर निर्माण करू शकला नाही व्हॉट्सअपवर होतो सौदा! सेक्स रॅकेटमध्येही आता तंत्रज्ञानाचा (गैर) वापर वाढला आहे. यापूर्वी हा धंदा करणारी मंडळी ग्राहकांना मुलींचा अल्बम दाखवत. आता ते ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर मुलींचे फोटो पाठवतात. आवडत्या मुलींचा सौदा देखील व्हॉट्सअपवरच होतो. ई पेमेंटवर होतो व्यवहार हा सर्व व्यवहार करणारी मंडळी आपली ओळख गुप्त ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. ती सहसा पुढे येत नाहीत. सौदा निश्चित झाल्यानंतर ते ‘ई पेमेंट’नं पैशांची मागणी करतात. हा व्यवसाय करणाऱ्या मुलींना या व्यवहाराची काहीही कल्पना नसते. अनेकदा ही मंडळी ग्राहकांकडून पैसे घेऊन पुढील व्यवहार पूर्ण करत नाहीत. आपली बदनामी होईल या भीतीनं याबाबत तक्रार करणं टाळलं जातं. याचा फायदा या गुन्हेगारांना होतो. एड्स पीडित मुलींचा वापर पोलिसांनी यापूर्वी टाकलेल्या एका धाडीत काही एड्स पीडित मुली देखील हा व्यवसाय करत असल्याचं उघड झालं होतं. त्याचबरोबर परराज्यातून कामाच्या शोधात आलेल्या मुलींना देखील जबरदस्तीनं या धंद्यात ढकलण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली होती. लुधियानातील सेक्स रॅकेटमुळे अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली असून अनेक कंगाल झाली आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीनं या प्रकरणात कारवाई करुन हे संपूर्ण रॅकेट नष्ट करावं अशी मागणी होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Punjab, Sex racket

    पुढील बातम्या