मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुणेकर पोराने जीव दिला, राजस्थानमध्ये मारेकरी सापडला, अख्ख गावच करतंय सेक्सटॅार्शन कांड!

पुणेकर पोराने जीव दिला, राजस्थानमध्ये मारेकरी सापडला, अख्ख गावच करतंय सेक्सटॅार्शन कांड!

'संपूर्ण गावच हा व्यवसाय करायला लागल्यावर आजूबाजूच्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस ही या गावात चालवले जातात'

'संपूर्ण गावच हा व्यवसाय करायला लागल्यावर आजूबाजूच्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस ही या गावात चालवले जातात'

'संपूर्ण गावच हा व्यवसाय करायला लागल्यावर आजूबाजूच्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस ही या गावात चालवले जातात'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 22 नोव्हेंबर : पुण्यात दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम वाडकर या विद्यार्थ्याने सेक्सटॅार्शनला बळी पडून आत्महत्या केली होती. शहरात हजारो नागरिकांची अशाच पद्धतीने फसवणूक केली होती. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी जंग जंग पछाडलं आणि अखेर राजस्थान गाठलं. अगदी राजस्थानी वेषभूषा करून आरोपीला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे अलवर जिल्ह्यातील गुरूकोठडी हे अख्ख गाव देशभरात हा सेक्सटॅार्शनचा धुमाकूळ घालत असल्याचे समोर आले आहे.

राजस्थान राज्यात अलवार जिल्ह्यातील गुरू कोठडी गाव. या गावात एकूण घर 560 आणि प्रत्येक घरात एकच व्यवसाय, ॲानलाईन गंडा घालायचा. देशातले अनेक नावाजलेले उद्योजक, न्यायाधीश, वकील यांना या गावाने सेक्सटॅार्शनच्या नावाखाली गंडा घातला आहे. रक्कम काही हजारातून सुरू होते ती अगदी लाखो रूपयांपर्यंत पोहोचली. पुण्यात घडलेल्या दोन आत्महत्यांचं कारण हेच गाव असल्याचे आता उजेडात आलं आहे.

देशभरात असे हजारो गुन्हे केलेल्या या गावात मातीच्या घरात एसी, मोठ्या चारचाकी गाड्या दिसतात. गावाबाहेर बसलेली तरूणींची टोळी गावात कुणी नवीन आलं की, सगळ्या गावाला अलर्ट करते. अगदी जमतारा वेबसिरीज मध्ये घडतं तसंच या गावात घडतं.

(श्रद्धाची हत्या का केली?, आफताफने कोर्टात सांगितली 'ती' परिस्थिती...)

पुण्यात तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशमधील पोलीस अधिकारी या गावात पोहोचली. कुणी आपल्याला ओळखू नये म्हणून पुणे पोलिसांनी या गावात जाण्याआधी वेषांतर केला. त्यानंतरस्थानिक पोलिसांच्या मदतीने गावात एंट्री केली आणि अन्वर सुभान खान या आरोपीला अटक केली.

(आणखी एक 'श्रद्धा', पाच नराधमांकडून चिमुकलीवर वर्षभर अत्याचार)

संपूर्ण गावच हा व्यवसाय करायला लागल्यावर आजूबाजूच्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस ही या गावात चालवले जातात. गंमतीची बाब म्हणजे, आरोपी पकडल्यावर जेव्हा त्याला ट्रांझिट रिमांडसाठी न्यायालयात नेल्यावर न्यायालायाने थेट चार दिवस रिमांड देत असा प्रकार त्यांच्या सोबतही घडल्याचं तपास पथकाला सांगितलं. ज्या रेल्वेने पोलीस पुण्यात परत आले त्या रेल्वेच्या टीसीला ही असाच गंडा घातल्याने त्याने पोलिसांना तातडीने बर्थ उपलब्ध करून दिल्या. प्रीती शर्मा किंवा प्रीत यादव या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून ही फसवणूक केली जायची, अशी माहिती तपास अधिकारी अक्षय सरोदे यांनी दिली.

जमतारा वेबसिरीजला लाजवेल अशा पद्धतीने राजस्थान मधल्या ग्रामीण भागात हे सिंडीकेट चालवले जातात. या सिंडीकेटचा पर्दाफाश करण्यासाठी केवळ स्थानिक तपास यंत्रणाच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या समोर ही मोठ आव्हान आहे.

First published:

Tags: Marathi news, Pune