पुणे, 20 एप्रिल : स्वारगेट पोलिसांनी (Pune Swargate Police) 2 चोर पकडले आहेत आणि गंमतीशीर बाब म्हणजे हे चोरटे कोलकात्याचे (Kolkata) आहेत. तिथून चोरीसाठी ते पुण्यात यायचे. आता तुम्ही म्हणाल यात काय गंमतीशीर आहे? तर ते असं की हे दोन महाभाग विमानाने कोलकाता येथून पुण्याला यायचे आणि सायकली चोरायचे. स्वारगेट पोलिसांनी त्यांना पकडल्यावर त्यांच्याकडून एक, दोन नाही तर तब्बल 35 सायकली हस्तगत केल्या आहेत.
महागड्या किंवा एक लाख भर रुपयाच्या आसपास किंमती असलेल्या सायकली हे चोरटे चोरयचे. त्या सायकली किरकोळ किंमतीला विकायचे. मिळालेल्या पैशातून ऐश करायची आणि विमानाने परत जायचं. असा या टोळक्याचा कार्यक्रम असायचा. मात्र स्वारगेट पोलिसांकडे 10 ते 12 सायकल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यावर त्याचा गांभीर्याने तपास करण्यात आला आणि या चोरट्यांना अटक करण्यात आली. आणखी एक गंमतीची बाब म्हणजे या चोरट्यांनी कोलकात्याला जाण्यासाठी विमानाची तिकीटं काढलेली होती. मात्र त्यापूर्वीच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत.
पुण्यात इको कारची सायलेन्सची चोरी करणाऱ्या चोरट्यांना बेड्या
विशेष म्हणजे पुण्यात दोन दिवसांपूर्वी चोरीची आणखी असंच काहीसं चित्र-विचित्र प्रकरण समोर आलं होतं. काही तरुण मारुती सुझूकी कंपनीच्या इको गाडीचे सायलेन्स चोरायचे. सायलेन्सरमध्ये असणाऱ्या सुक्ष्म प्लॅटेनियम प्लेटसाठी ते सायलेन्सर चोरायचे. या प्रकरणी पोलिसांनी दोन चोरांना बेड्या ठोकल्या होत्या. पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत 2021 ते 2022 या दरम्यान इको कारचे सायलेन्सर चोरीला गेल्याच्या सहा तक्रारी आल्या होत्या. सायलेन्सर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत केलं होतं. पोलिसांचा या प्रकरणात तपास सुरु होता. यासाठी पोलिसांनी काही सूत्रांना, खबऱ्यांनाही कामाला लावलं होतं. चोर बाजारात सायलेन्सरमध्ये असलेली प्लॅटेनियम धातूची पट्टी कोणी विकतंय ता याकडे करडी नजर ठेवण्याचं काम पोलिसांकडून सुरु होतं.
(2 लाख घेऊन केलं लग्न अन् 8 दिवसांत नवरी गायब, अखेर मास्टरमाईंड वरात पोलिसांच्या दारात)
या दरम्यान 16 एप्रिलला पोलिसांना सायलन्सरच्या चोरीत सहभागी असलेल्या संशयितांचा सुगावा लागला. संशयित आरोपी हे उरुळी देवाची परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी उरुळी देवाची परिसरात सापळा रचला. त्यानंतर संशयित आरोपी उरुळी देवाची परिसरात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या आरोपींकडे सायलेन्सरमधील प्लॅटिनियमची प्लेट सापडली. पोलिसांनी त्या सगळ्या प्लेट जप्त केल्या. चोरट्यांनी अशाप्रकारे डझनभर गाड्यांचे सायलेन्सर चोरी केल्याचं नंतर तपासातून समोर आलं. संशयित आरोपी हेच खरे चोर असल्याची शहानिशा झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. शिवप्रसाद रोकडे (वय 21) आणि राम ढोले (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. दोघे आरोपी हे आळंदीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींची कारही जप्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Kolkata, Pune, Pune police