हायवे लगत हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी मराठी तरुणीसह दोघींची केली सुटका

हायवे लगत हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी मराठी तरुणीसह दोघींची केली सुटका

दौंड तालुक्यात पांढरेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले अनुराधा हॉटेल याठिकाणी देह विक्री व्यवसाय केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

  • Share this:

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 25 ऑक्टोबर : पुणे-सोलापूर महामार्गावरील (pune solapur highway) एका  हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश करण्यात दौंड पोलिसांना (dound police) यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे तर 3 महिलांची सुटका केली आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पांढरेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले अनुराधा हॉटेल (Anuradha Hotel) याठिकाणी देहविक्री (Prostitution) व्यवसाय केला जात आहे, अशी गोपनीय माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांना मिळाली होती.  गवळी यांनी या बद्दलची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना दिली. त्यानंतर त्या हॉटेलवर छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले.

बॉडी बिल्डर तरुणांना घातक औषध विकणाऱ्याला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना

पोलिसांनी अनुराधा हॉटेलमध्ये बोगस गिऱ्हाईक प्रथम पाठवला. त्यानंतर सेक्ट रॅकेटची खबर पक्की झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या टीमने छापा टाकला. हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका पोलिसांनी केली. त्यापैकी दोन महिला या पश्चिम बंगालमधील आहे तर एक महिला महाराष्ट्रीयन आहे.

हॉटेल चालक दिवाकर मथु शेट्टी (वय 34, राहणार उडपी राज्य कर्नाटक) व डायसन डेनिस डिसूजा (वय 27) या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्रीची सुटका

दरम्यान, मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील 3 स्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे.  मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे.

काय सांगता फक्त 35 रुपये किलो कांदा? 'या' शहरात खरेदीआधी दाखवावा लागतो ID

त्यापैकी एक अभिनेत्री ही हिंदी टीव्ही मालिकांमध्ये तर दुसरी मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री होती, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांमधली मुंबईतली ही तिसरी घटना असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पडणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

Published by: sachin Salve
First published: October 25, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या