• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर, 25 वर्षीय तरुणीवर नवऱ्याच्याच संमतीने बलात्कार

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर, 25 वर्षीय तरुणीवर नवऱ्याच्याच संमतीने बलात्कार

जेव्हा महिलेनं बलात्काराबद्दल आपल्या पतीला सांगितले तेव्हा पतीने दिलेल्या उत्तराने तिला जबरदस्त धक्का बसला.

 • Share this:
  वैभव सोनवणे, पुणे, 12 फेब्रुवारी : पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी आणि पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका होस्टेलमध्ये राहत असताना त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका व्यक्तीने महिलेवर अत्याचार केला. जेव्हा तिने हे आपल्या पतीला सांगितले तेव्हा पतीने दिलेल्या उत्तराने तिला जबरदस्त धक्का बसला. पतीने तिला सांगितले की मीच तुझ्यासोबत त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. सुरेश शैशराज शिंदे (वय 34, रा.धनकवडी) असे अटक केल्याचे नाव आहे. ही घटना कात्रज परिसरातील एका होस्टेलवर नोव्हेंबर 2019 मध्ये घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या पतीसमवेत होस्टेलवर कामाच्या निमित्ताने वास्तव्यास होती. या होस्टेलमधील सुरेश शिंदे याने या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. धक्कादायक! कपडे बदलताना तरुणींचे काढायचा VIDEO, मुंबईत लेडीज टेलरला अटक ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा त्याने आपणच सुरेश शिंदे याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. त्यानंतर पीडितेने आपल्या गावी परभणी येथे गुन्हा दाखल केला. परभणी पोलिसांनी पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातीलभारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरेश शिंदे व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन शिंदे याला अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे.
  Published by:Akshay Shitole
  First published: