मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

स्कूल बस चालकाचा 15 वर्षीय मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

स्कूल बस चालकाचा 15 वर्षीय मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

आरोपीने पीडितेला रिलेशनशिपमध्ये राहाण्यासाठीही विचारणा केली होती? यानंतर त्याने ओळखीचा गैरफायदा घेत तिला पडक्या इमारतीत नेलं आणि तिथेच तिच्यावर जबरदस्ती केली.

    पुणे 18 जुलै : पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यात स्कूल बसचालकाने दहावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. चालकाने या मुलीला जबरदस्तीने एका पडक्या इमारतीत नेलं आणि तिथेच तिच्यावर अतिप्रसंग केला, अशी माहिती समोर आली आहे (Pune School Bus Driver Rapes Minor Girl). बायको स्वत:जवळ झोपू देत नव्हती, रागाच्या भरात पतीनं उचललं टोकाचं पाऊल समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीत शिकत होती. ती स्कूल बसने ये-जा करत असे. याचदरम्यान तिची आरोपी स्कूल बसचालकासोबत ओळख झाली. आरोपीने पीडितेला रिलेशनशिपमध्ये राहाण्यासाठीही विचारणा केली होती? मात्र रिलेशनशिपचा नेमका अर्थ या विद्यार्थीनीला समजला नाही. यानंतर आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत तिला पडक्या इमारतीत नेलं आणि तिथेच तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोमेश्वर घुले पाटील असं आरोपीचं नाव आहे. पीडित मुलीने त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. तिच्यासाठी कायपन... पुण्यातील प्रियकराने प्रेयसीसाठी एक-दोन नाही तर चोरल्या तब्बल 15 गाड्या मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने मार्च ते जून महिन्यादरम्यान तिच्यावर अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला होता. अखरे पीडितेने याबाबत आपल्या घरी माहिती दिली आणि कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सध्या 35 वर्षीय आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pune crime, Rape case

    पुढील बातम्या