पुणे, 23 जानेवारी : तुरुंगामध्ये रुग्णालयात मोफत डायलिसिस उपचाराचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली रुग्णांची फसवणूक करणाऱ्या अमित कांबळेचा आणखी प्रताप समोर आला आहे. आता तर या भामट्याने पुणे पोलिसांनाच फोन करून नव्या पोस्टसाठी ऑफर दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी त्याच्याविरोधात बंडगार्ड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कांबळे या ठगाने स्वत:ला वरिष्ठ निरीक्षकाचे पाटील असल्याचे सांगून पुणे पोलीस गुन्हे शाखेतील एका हवालदाराला पसंतीच्या युनिटमध्ये बदली करण्यास मदत करण्याचे आमिष दिले. त्यानंतर तक्रारदार हवालदार रुस्तम मुजावर (47) यांच्यासह गुन्हे शाखा आणि नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या आणखी चार हवालदारांना शनिवारी सायंकाळी 5 ते 5.45 च्या दरम्यान 'वरिष्ठ निरीक्षक पाटील' यांच्या बदल्यांचे आश्वासन देणारे फोन आले.
कांबळे याने पोलिसांना आश्वासन दिले पण त्याच्या बोलण्यावर त्यांना विश्वास बसला नाही. त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोकळे यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना फोन करण्याचा शोध घेण्याचे आदेश दिले.
रेड्यांच्या टक्करीवरून माणसांमध्येच जुंपली; खेळ राहिला लांब अन् नांदेडमध्ये...
त्यानंतर बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरात फोन वापरणाऱ्याचा माग काढला. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याची ओळख कांबळे म्हणून केली. कांबळेवर याआधीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे.
‘अमित कांबळेनं पोलिसांना या पद्धतीनं फोन करण्याची ही पहिलीच घटना नाही. त्यानं हे प्रकार यापूर्वीही तीन-चार वेळा केली आहे. आम्ही अमित कांबळेला शनिवारी अटक केली होती. त्यावेळी त्यानं आम्हाला किडनीचा त्रास असल्याचं तोंडी सांगितलंय. डायलसिसवर मोफत उपचार व्हावे म्हणून तो पोलिसांना या पद्धतीनं फोन करून त्रास देतो. त्याची मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्याला खरंच डायलिसिसचा त्रास आहे का? हे समजेल. त्यानंतरच अमितवर पुढील कारवाई करण्यात येईल,’ अशी माहिती बंड गार्डन पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे.
कांबळेच्या नावावर यापूर्वीही सहा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ससून जनरल हॉस्पिटलमध्ये डायलिसिस उपचार मिळावेत म्हणून तो लोकांना, विशेषत: पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांना फोन करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करायचा. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Pune, पुणे पोलीस