मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Pune : पेट्रोल पंपावर दरोडा, कुऱ्हाडीनं वार करुन लुटली रोकड! पाहा Live Video

Pune : पेट्रोल पंपावर दरोडा, कुऱ्हाडीनं वार करुन लुटली रोकड! पाहा Live Video

पुण्यातील नऱ्हे परिसरातील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा (Pune Petrol Pump Robbery)  पडला. यावेळी दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत रोकड लुटली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Onkar Danke

पुणे, 23 ऑगस्ट : पुण्यातील नऱ्हे परिसरातील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा (Pune Petrol Pump Robbery)  पडला. यावेळी दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत रोकड लुटली. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. या मारहाणीत पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाले आहेत.

काय घडली घटना ?

या प्रकरणात पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, 'पुण्यातील नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ हा पेट्रोल पंप आहे. मध्यरात्री फारशी वर्दळ नसल्यानं येथील कर्मचारी केबिनमध्ये आराम करत होते. त्यावेळी रात्री दीडच्या सुमारास दरोडेखोर तिथं आले. यामधील एका दरोडेखोरानं त्यांच्याकडं पैशांची मागणी केली. त्याला कर्मचाऱ्यांनी नकार देताच एका दरोडेखोरानं त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली आणि दुसऱ्याला मारहाण केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जीवाच्या भीतीनं ड्रॉवरमधील सर्व रक्कम त्या दरोडेखोराला दिली.

हल्लेखोरानं ही रक्कम स्वत:च्या ताब्यात घेतली आणि तो कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत तिथून पळून गेला. त्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. त्यांनी या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहे.

मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video मधून कळेल नेमका प्रसंग

पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं तयार केली आहेत. या दरोड्यात आणखी किती जणांचा समावेश आहे, या शोध पोलीस घेत आहेत. पेट्रोल पंपावर झालेल्या या हल्ल्यानं परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

First published:

Tags: Pune, Robbery