पुणे, 24 मार्च : लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच 'मावशी आजारी आहे' असं सांगून घरातील 5 तोळे दागिने अंगावर घालून नववधू पसार झाल्याची धक्कादायक घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे घडली आहे. याबाबत नितीन कांताराम कुरकुटे या नवरदेवाने मंचर पोलीस (Manchar Police) ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, भराडी येथील फिर्यादी नितीन कुरकुटे हे लग्नासाठी मुलगी शोधत असताना त्यांच्या ओळखीतील मध्यस्ती नवनाथ महादेव गवारी याने कुरकुटे यांना परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर येथील लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण या मुलीचे स्थळ सुचवले. त्यानंतर कुरकुटे यांनी 14 मार्च 2021 रोजी गवारी यांना मध्यस्थीचे दीड लाख रुपये दिले त्यानंतर मुलीची मावशी, मामा आणि काळे नावाचा इसम यांनी 'घाई गडबड करून आम्ही गरीब आहे' असे सांगून नवऱ्या मुलाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी भराडी( ता.आंबेगाव) येथे फिर्यादीच्या राहत्या घरी साध्या पद्धतीने विवाह केला.
सोशल मीडियावर स्वतःचे नग्न फोटो पाहून महिला हैराण, समोर आली धक्कादायक गोष्ट
त्यानंतर आठ दिवसातच नवरी मुलीने तिची मावशी आजारी आहे असे सांगून अंगावर पाच तोळे दागिने घालून गेली. आठ ते दहा दिवस होऊनही ती घरी आली नाही. त्यामुळे लक्ष्मी कुठे गेली असेल अशी चौकशी केली असता नवरी मुलगी आणि तिच्याबरोबर असलेले मामा, मावशी हे शिंगणापूर येथील पत्त्यावर राहत नसून ती खोली त्याने एक दिवसासाठी भाड्याने घेतली असल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादी कुरकुटे यांनी लग्न जमविणारे मध्यस्थी गवारी यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
कुत्र्यांना पाहाताच चोराला फुटला घाम, भीतीनं दोन टप्प्यात परत केले चोरलेले पैसे
याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन कुरकुटे यांनी नवनाथ महादेव गवारी ( रा. गवारीमळा मेंगडेवाडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण ( मुलगी ), कमल नामदेव जाधव (मावशी), महादेव लक्ष्मण चिंचवड (मामा) व काळे नावाचा इसम सर्व रा.शिंगणापूर तालुका जिल्हा, परभणी ) याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news