धक्कादायक! नकोशीला फेकलं जंगलात, पुण्यात रक्तबंबाळ अवस्थेत सापडली चिमुकली

मायलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलगी नकोशी झाली म्हणून जन्मदात्यांनी तिला जंगलात बेवारस सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 07:25 AM IST

धक्कादायक! नकोशीला फेकलं जंगलात, पुण्यात रक्तबंबाळ अवस्थेत सापडली चिमुकली

पुणे, 31 ऑगस्ट : मायलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलगी नकोशी झाली म्हणून जन्मदात्यांनी तिला जंगलात बेवारस सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात नुकत्याच जन्मलेल्या या चिमुकलीला फेकण्यात आलं होतं. शुक्रवारी (30 ऑगस्ट) ही घटना उघडकीस आली. राजगुरूनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हे अर्भक ताब्यात घेतले. पण दुर्दैवानं चिमुकलीचा आधीच मृत्यू झाला होता. "मुलगी वाचवा, देश वाचेल" असा नारा देशभरात दिला जातो. मात्र प्रत्यक्षात या संदेशाचं किती पालन केलं जात? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. जन्मलेली मुलगी नकोशी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या तीन महिन्यांत खेड तालुक्यात एकूण चार नकोशी आढळून आल्या.

(वाचा : इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या,बॉलिवूडमध्ये करायचं होतं करिअर; पण...)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगरजवळील पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात ही चिमुकली बेवारस आढळली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता त्यांना नुकतीच जन्मलेली ही चिमुकली आढळून आली. मात्र ती मृतावस्थेत होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलिसात अज्ञात आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(वाचा : पतीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात 5 महिन्यांच्या गर्भवतीनं इमारतीवरून मारली उडी)

VIDEO : चिमुरडीचं करणार होता अपहरण, नवी मुंबईकरांनी धु-धु धुतला

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 07:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...