मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ती घरातही सुरक्षित नाही! वडील, चुलते आणि आजोबांकडूनच मुलीवर 6 वर्ष बलात्कार, पुण्यातील हादरवणारी घटना

ती घरातही सुरक्षित नाही! वडील, चुलते आणि आजोबांकडूनच मुलीवर 6 वर्ष बलात्कार, पुण्यातील हादरवणारी घटना

फाईल फोटो

फाईल फोटो

वडील, काका आणि आजोबा यांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला. यानंतर पुणे पोलिसांनी बुधवारी या घटनेचा तपास सुरू केला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे 18 नोव्हेंबर : पुण्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. यात एका 17 वर्षीय मुलीवर तिचे वडील, चुलते आणि आजोबा यांनीच वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलीने लैंगिक छळाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तिच्या महाविद्यालयाने स्थापन केलेल्या अंतर्गत समितीला याबाबतची माहिती दिली. वडील, काका आणि आजोबा यांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला. यानंतर पुणे पोलिसांनी बुधवारी या घटनेचा तपास सुरू केला

2016 ते 2018 दरम्यान ही मुलगी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी गेली होती. त्यावेळी तिच्यावर चुलता विजयने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले तर आजोबा रामेश्वरने तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती पुण्यात कुटुंबियांसोबत राहण्यास आली तर वडील अजयनेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मागील सहा वर्षांपासून तिच्यावर हे अत्याचार सुरू होते.

पुणे: आधी मैत्री करून सोबत फोटो काढले; मग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीसोबत संतापजनक कृत्य

याप्रकरणी पुणे शहरात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुलीच्या 49 वर्षीय वडिलांना अटक केली आहे. लवकरच तिचे काका आणि आजोबा यांना अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितलं की, मुलीचं कुटुंब काही वर्षांपूर्वी पुण्यात आलं.

एफआयआरनुसार, युपीमध्ये असताना तिच्या काकांनी मुलीवर बलात्कार केला आणि तिच्या आजोबांनी दोन वर्षांपर्यंत तिचं लैंगिक शोषण केलं. पुण्यात गेल्यानंतर तिने तिच्या वडिलांना अत्याचाराची माहिती दिली, असं त्यात नमूद केलं आहे. परंतु, वडिलांनीही तिचं लैंगिक शोषण आणि बलात्कार केला असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यावर महिलेसोबत धक्कादायक प्रकार, सासऱ्यानेही केली शरीरसुखाची मागणी

“बुधवारी, विशाखा मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सत्रादरम्यान मुलीने तिच्या काका, आजोबा आणि वडिलांकडून गेल्या सहा वर्षांत झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाबद्दल अधिकाऱ्यांसमोर खुलासा केला. अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी सुरू करण्यात आली आणि तिच्या वडिलांना अटक करण्यात आली. 'आम्ही यूपीमधील गावी असलेल्या तिच्या काका आणि आजोबांना अटक करू', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “मुलीला समुपदेशन दिलं जात आहे. हे प्रकरण महिला आणि बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आलं आहे,” असं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.

First published:

Tags: Crime news, Rape