मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'ती' लेकीचं ट्युशन घेण्यासाठी घरी यायची, बापाचा जडला जीव, पण शेवट धक्कादायक, पुण्यातली घटना

'ती' लेकीचं ट्युशन घेण्यासाठी घरी यायची, बापाचा जडला जीव, पण शेवट धक्कादायक, पुण्यातली घटना

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

Pune Crime : प्रियंका बीएमसीसी महाविद्यालयात वाणिज्या शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती.

पुणे, 30 मार्च : स्वतःच्या मुलांची शिकवणी घेण्यासाठी येणाऱ्या 21 वर्षीय तरुणीलाच विवाहित पुरुषाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. मात्र, पुरुषाने लग्नास नकार दिल्याने तरुणी नैराश्यात गेली. यातूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील उत्तमनगर भागात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने सर्वांना धक्का बसला आहे.

प्रियंका यादव (वय 21 वर्ष, रा. उत्तमनगर, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुरींदरसिंग (रा. एनडीए क्वॉर्टर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तिचा भाऊ प्रशांतकुमार दिलीप यादव (वय 25 वर्ष, रा. मोरसा रेसिडेन्सी, उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या राहत्या घरी 25 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला.

काय आहे प्रकरण?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण प्रियंका बीएमसीसी महाविद्यालयात एम.कॉम.चे शिक्षण घेत होती. ती एनडीएमध्ये दोन आर्मी अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन एक वर्षापासून त्यांच्या मुलांचा क्लास घेत होती. 25 मार्च रोजी ती सकाळी उठली. आईला जेवायला वाढ असे म्हणून साडेदहा वाजता आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने तिच्या आईने दरवाजा वाजविला, तरी तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडला असता तिने पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तयार केलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

वाचा - पतीसोबत झाला वाद अन् समोरून रेल्वे येताच तीन मुलांसह उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांना बाथरूममध्ये चिठ्ठी मिळाली. त्यात गुरींदरसिंग याच्याबरोबर 7 महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. परंतु काही दिवसानंतर त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिल्याने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिले होते. तिच्या मोबाइलचा पासवर्ड चिठ्ठीत दिला होता. त्यावरून मोबाइलमधील फोटो पाहिल्यावर याच गुरींदरसिंग याच्या मुलांना ती शिकवायला घरी जात असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक चवरे तपास करीत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Pune