पुणे 20 जानेवारी : विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. यात जादूटोणा करुन अघोरी पूजा करण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. डोक्याला पिस्तूल लावून सूनेला मानवी हाडाची पावडर खायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वघरामध्ये सुख शांती नांदावी, भरभराट व्हावी आणि मुल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केली.
पत्नीला आरोपी पती तसेच घरातील इतर जणांनी संगनमत करून शारीरिक आणि मानसिक छळ करून वारंवार मारहाण करून शिवीगाळ केल्याचा हा प्रकार पुणे शहरातील धायरी भागात २०१९ पासून सुरू होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती.
कोयता गँगला आवरणार कधी? मैदानात झोपलेल्या वृद्धावर सपासप वार, पुण्यात चाललंय काय?
एका अमावस्येच्या दिवशी रात्री सर्वजण जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले. तिथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली आणि राख मडक्यात घेतली. ते सर्व घरी आणून त्याची पूजा केली. मडक्यातील राख पाण्यामध्ये टाकून ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिलं.
यानंतर फेबुवारी 2021 मध्ये जावेच्या निगडी येथील घरी पूजा करण्यात आली. त्यासाठी मृत माणसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय आणि कोंबडीचे धड हे सर्व जावेच्या आईवडिलांनी आणून ठेवलं. मांत्रिक महिलेनं अघोरी पूजा केली. त्यानंतर हाडाची पावडर करून ती फिर्यादीला खायला सांगितली.
ओढणीवरील बोरकोडने उकललं त्या महिलेच्या पुण्यातील हत्येचं गूढ; 2 प्रियकरांनीच काढला काटा
याबरोबरच सासरचे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी अनेक वेळा मागणी करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे. घरात भरभराट व्हावी तसेच महिलेला मुलगा व्हावा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर आणि जावेने मिळून अघोरी आणि जादूटोणा करून पूजादेखील घातली होती. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसांत धाव घेतली.
पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी आरोपींची नावं आहेत. या सर्वांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune crime, Shocking news