पुण्यात मित्रच झाला मारेकरी, तरुणाचा दगडाने ठेचून केला खून; आरोपी अटकेत

पुण्यात मित्रच झाला मारेकरी, तरुणाचा दगडाने ठेचून केला खून; आरोपी अटकेत

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत.

  • Share this:

पुणे, 23 जुलै : पुणे जिल्हातील वाघोली येथील चोखीदाणी रोड लगत एका बिगारी कामगाराचा दगडाने ठेचून खून (Pune Murder) करण्यात आला. त्यानंतर लोणीकंद पोलीसांनी तत्परता दाखवत कुठलाही पुरावा नसताना 36 तासांच्या आत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दारू पिताना झालेल्या जुन्या भांडणाच्या वादातून आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने जुन्या मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे. दत्ता लक्ष्मण बडंगर(वय 35वर्षे ) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सागर कैलास पवार (वय वर्षे 27 )आणि बालाजी किसन गोरे( वय 29 वर्षे )या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यांमधील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. दिवसागणिक खून, मारामाऱ्या यांसारख्या घटना समोर येत आहेत. कालही (बुधवारी) पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी व्यावसायिकावर गोळीबार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मावळमधील वाहनगावात घडली. या गोळीबारामध्ये चार गोळ्या लागल्याने व्यवसायिक गंभीर जखमी झाला आहे.

मिलिंद मणेरीकर असं जखमी झालेल्या 50 वर्षीय व्यावसायिकाचे नाव आहे. मणेरीकर हे आपल्या XUV कार मधून चेतन निमकर या मित्रासोबत कामानिमित्त वाहनगाव येथे असलेल्या संकल्प फार्म हाऊसवर जाताना त्यांच्यावर गोळीबार झाला.

Published by: Akshay Shitole
First published: July 23, 2020, 2:42 PM IST

ताज्या बातम्या