पुणेकरांनो सावधान, नव्या 'सायबर' गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहे शहर

पुणेकरांनो सावधान, नव्या 'सायबर' गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहे शहर

सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्याने नागरीकांनी Online व्यवहार करताना काळजी घ्यावी असं आवाहन केलंय.

  • Share this:

पुणे 08 जानेवारी : महाराष्ट्रातलं प्रचंड वेगाने वाढणारं शहर म्हणून पुणे ओळखलं जातं. पुण्यातलं गुन्हेगारांचं प्रमाणही जास्त आहे. पुण्यातल्या गुन्ह्यांची आकडेवारी शहर पोलिसांनी जाहीर केली असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पुण्यामध्ये दाखल होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालंय. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये शहरातील दाखल गुन्ह्यांची संख्या जवळजवळ साडेआठशेने कमी झालीय. मात्र त्याचवेळी शहरातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय म्हणावं इतकं वाढलं अशी माहिती पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीत पुढे आलीय अशी माहिती सह पोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी दिलीय.

गंभीर किंवा शरीरावर हल्ल्यासंदर्भातल्या गुन्ह्यांची संख्या कमी झालीय. घरफोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय. यंदाच्या वर्षात वाहतुक सुरळीत करणं आणि अपघात कमी करणं हे लक्ष असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

यंदाच्या वर्षात अपघातांची संख्या ही कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न यशस्वी ठरलाय मात्र त्यासाठी पोलिसांनी केलेली कारवाई आणि वाहतूकीच्या उल्लंघनाच्या माध्यमातून गोळा केलेला दंड याबाबतची आकडेवारी मात्र द्यायला पोलिसांनी टाळाटाळ केलीय. त्याचं कारण म्हणजे केवळ हेल्मेटपोटी केलेल्या दंडाची रक्कम ही १०० कोटींच्या आसपास गेल्याची माहिती समोर आलीय.

Osmanabad ZP Election : शिवसेनेच्या सावंताची पक्षविरोधी भूमिका, भाजपशी घरोबा

अशी आहे पुण्यातल्या गुन्ह्यांची आकडेवारी?

खून - 74

खुनाचा प्रयत्न - 121

मारामारी - 155

दरोडा - 20

घरफोडी - 460

बलात्कार - 224

साखळी चोरी - 64

वाहनचोरी - 1678

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 06:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading