मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! दिग्दर्शकाने अश्लिल व्हिडीओ बनवून अभिनेत्रीवर केला बलात्कार

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! दिग्दर्शकाने अश्लिल व्हिडीओ बनवून अभिनेत्रीवर केला बलात्कार

Representative Image

Representative Image

पुण्यातून एक धक्कादायक (Pune Crime News Update) बातमी समोर आली आहे. कास्टिक काऊचचा (Casting Couch in Pune) भयंकर प्रकार पुण्यात समोर आला आहे. सिने इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

पुणे, 30 मार्च: पुण्यातून एक धक्कादायक (Pune Crime News Update) बातमी समोर आली आहे. कास्टिक काऊचचा (Casting Couch in Pune) भयंकर प्रकार पुण्यात समोर आला आहे. सिने इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित तरुणी फिल्म इंडस्ट्रीत बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत असल्याची माहिती तिने दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये दिली आहे. अशी माहिती समोर आली आहे की, तरुणीचा अश्लिल व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती आणि तिच्यावर जबरदस्तीने वारंवार शारीरीक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी मधुबन सोसायटी, कळस याठिकाणी राहणाऱ्या अमित प्रेमचंद सिटलानी (वय 40) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया अहवालानुसार या तरुणीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने पोलिसांना याप्रकरणी अधिक चौकशी करता आली नाही आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात कात्रज कोंढवा रोड याठिकाणी राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित तरुणी मे 2017 पासून 26 मार्चपर्यंत या भीषण अत्याचाराचा सामना करत होती. अमित सिटलानी हा कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम पाहतो. अमितवर असे आरोप आहेत की त्याने फिर्यादी तरुणीला पार्टीच्या निमित्ताने मित्राच्या फ्लॅटवर नेले होते, ही घटना 2017 ची आहे. त्यावेळी ही तरुणी अल्पवयीन होती. याठिकाणी त्याने बदनामीची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला होता आणि घटनेचा अश्लिल व्हिडीओ बनवला होता. लोकमतने याविषयी वृत्त दिले आहे.

हे वाचा-धक्कादायक! 3 महिन्यांच्या मुलीची एका आठवड्यात 10 वेळा विक्री; प्रकरणात जन्मदात्याचाही सहभाग

त्यानंतर या नराधमाने 2018 पासून तिला हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. पुण्यातील विविध हॉटेल्सवर तो तिला बोलावत असे आणि वारंवार बलात्काराचं कृत्य करत असे. तुझी इंडस्ट्रीत बदनामी होईल अशी धमकी दिल्याने तिने आतापर्यंत हा प्रकार कुणाला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. 26 मार्च रोजी पुन्हा असाच प्रकार झाला, यावेळी त्याने तिला मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार या तरुणीने केली आहे.

First published:

Tags: Crime, Pune, Pune crime news