खळबळजनक...पुण्याच्या व्यापाऱ्याची 2 कोटींसाठी अपहरण करून हत्या

खळबळजनक...पुण्याच्या व्यापाऱ्याची 2 कोटींसाठी अपहरण करून हत्या

मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली असून त्यात 2 Cr. नही दिये इसके लिये गया, भाई के ऑर्डर पे ठोकणा पडा असं लिहीलेलं आहे.

  • Share this:

किरण मोहिते, सातारा 05 जानेवारी : पुण्यातील व्यापार्‍याची दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरणकरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद जवळच्या पाडेगाव येथे डोक्यात गोळी झाडलेल्या अवस्थेत संबधित व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी सातारा येथील लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे येथील व्यापाऱ्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. चंदन शेवानी असं त्या व्यापारयाचं नाव आहे. चप्पल विक्रीचा चंदन शेवानी यांचा व्यवसाय असुन साधू वासवानी चौकातील परमार पॅराडाईझ येथे कुटूंबियासोबत ते राहत होते. काल संध्याकाळ पासुन त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या कुटूंबीयांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दिली होती.

आज (रविवारी) दुपारी सातारा जिल्ह्यातील पाडेगाव जवळच्या कॅनॉलमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती गावकर्‍यांनी पोलिसांना दिली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता डोक्यात गोळी झाडुन अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन संबधित व्यक्तीची निघृण हत्या केल्याचं स्पष्ट झाले.

पॉर्न पाहाताना तुमचा VIDEO होऊ शकतो रेकॉर्ड?

सातारा पोलिसांनी संबधित मृतदेहाच्या फोटो वरुन पुणे शहर, ग्रामीण, लोणावळा पोलिसांना संपर्क साधला असता पुणे येथील व्यापारी चंदन शेवानी यांचा हा मृतदेह असल्याचे माहिती समोर आलीय.

मुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, हे आहेत महत्त्वाचे अड्डे

या घटनेत सातारा पोलिसांना घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली असून, त्यात 2 Cr. नही दिये इसके लिये गया, भाई के ऑर्डर पे ठोकणा पडा असं लिहीलेलं आहे. त्यामुळे दोन कोटींच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरणकरून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2020 11:16 PM IST

ताज्या बातम्या