मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार, ट्रीट द पीपल...', पुण्याच्या रिक्षाचालकाकडून विनयभंग

'ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार, ट्रीट द पीपल...', पुण्याच्या रिक्षाचालकाकडून विनयभंग

पुण्यात रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

पुण्यात रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

पुण्यातील रिक्षा चालकाकडून परराज्यातील तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 20 मार्च : पुण्यातील रिक्षा चालकाकडून परराज्यातील तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. "ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, ट्रीट द पीपल लायकिनुसार: गुन्हेगार" असे देखील या रिक्षा चालकाने रिक्षावर लिहलेले आहे. या रिक्षा चालकाला पोलिसांनी जेजुरीमधून अटक केली आहे. सचिन जगताप असं अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही युवती कोथरूड परिसरात एका महाविद्यालयात शिक्षण घेते. ही मुलगी परराज्यातील आहे. 16 मार्चला ती गणेशखिंड या तिच्या राहत्या घरी जाण्यासाठी तिने कोथरूडहून रिक्षा पकडली. रिक्षात बसताच चालकाने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला.

कोथरूडहून रिक्षाचालकाने रिक्षा कर्वे रोड, एसबी रोडहून नेतानाही त्याने अनेकवेळा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटी वैतागलेल्या तरुणीने त्याला विद्यापीठाच्या गेटवर सोडायला सांगितलं. विद्यापीठाच्या आवारात पोहोचताच संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला.

विद्यापीठाच्या आवारात रिक्षात थांबलेल्या युवतीशी रिक्षाचालकाने अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तिने याचा विरोध केला आणि ती रिक्षातून बाहेर पडली. दरम्यान रिक्षाचालकाने तिला धमकावून तिचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यावर पुन्हा अश्लिल मेसेज करायला सुरूवात केली.

हा सगळा प्रकार घडल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला आणि त्याला जेजुरीमधून अटक केली आहे.

First published:
top videos

    Tags: Pune