मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुण्यात 64 वर्षांचे आजोबा सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; व्हिडीओ कॉल करुन..

पुण्यात 64 वर्षांचे आजोबा सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; व्हिडीओ कॉल करुन..

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

पुण्यातून सेक्सटॉर्शनचे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

पुणे, 30 मार्च : काही दिवसांपूर्वी पुण्यात सेक्सटॉर्शनला बळी पडून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. व्हॉट्सअॅपवरुन एका अनोळखी महिलेसोबत झालेल्या ओळखीतून त्याचा न्यूड व्हिडीओ शूट करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणाने हे पाऊल उचललं. या घटनेनंतर आणखी एक घटना आता समोर आली आहे. शहरातील एका 64 वर्षीय वृद्धाला न्यूड व्हिडीओ कॉल करुन न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित वृद्ध घरी असताना अनोळखी नंबरवरुन व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल आला. त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवत न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा व्हिडीओ रेकॉर्ड करुन व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी 4 लाख 66 हजार रुपये घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

राष्ट्रवादीचे आमदारालाही अडकवण्याचा प्रयत्न

सोलापूर मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर मिळवून त्यांच्याशी व्हाट्सअपवर संपर्क साधण्यात आला. वेळोवेळी अश्लील संदेश पाठवले तसेच अश्लील व्हीडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा  प्रयत्न केला. कॉल रेकॉर्ड करून यांचे फेसबुकवर असलेले मित्र यांना पाठविण्याच्या धमकी देऊन 1 लाख रुपये इतक्या रकमेच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. तसेच अश्लील व्हीडीओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा - पतीसोबत झाला वाद अन् समोरून रेल्वे येताच तीन मुलांसह उचललं टोकाचं पाऊल

काय आहे सेक्स्टॉर्शनचं जाळं?

तरुण आणि धनाढ्य व्यक्तींना गाठून फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते. या टोळीतल्या तरुणींना अश्लील बोलायला तयार केलेलं असतं. वेगवेगळ्या नंबरवरुन हा व्हिडिओ कॉल केला जातो. ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढायला लावले जातात. ज्याला जाळ्यात ओढायचं त्याला बोलायला भाग पाडून रेकॉर्डिंग केलं जात आणि त्यानंतर खंडणी मागण्यास सुरुवात होते. खंडणीची रक्कम बनावट खात्यात मागवली जाते.

First published:
top videos

    Tags: Crime, Pune