मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बाप झाला वैरी! जन्मदात्या पित्याकडून लेकीची निर्घृण हत्या, मन हेलावणारी घटना

बाप झाला वैरी! जन्मदात्या पित्याकडून लेकीची निर्घृण हत्या, मन हेलावणारी घटना

Representative Image

Representative Image

Father Kill Doughter : पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपीचा घरापासून दूर जळालेला मृतदेह आढळल्याने लोकांची भीती अधिकच वाढली होती. ग्रामस्थांनीच आरोपीला पकडलं. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पुढे वाचा ...

सीतामढी, 10 मे : देवीला प्रसन्न करण्याच्या नावाखाली एका निर्दयी बापाने आपल्याच मुलीचा बळी (psychopath father sacrificed daughter) दिल्याचा आरोप आहे. मारेकरी बापाने निष्पाप मुलीची हत्या (Father Kill Doughter) केल्यानंतर तिचा मृतदेहही (Father murdered Doughter and burnt deadbody) जाळला. अंधश्रद्धेची परिसीमा ओलांडणाऱ्या या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी मुलीचा खून करणाऱ्या बापाला अटक केली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. हत्येची ही घटना संपूर्ण परिसरात वणव्यासारखी पसरली असून लोक वेगवेगळे तर्क लावत आहेत.

घरात सापडलेल्या रक्ताच्या डागांमुळे या विक्षिप्त व्यक्तीचा या गुन्ह्यात हात असल्याचं उघड झालं. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मारेकऱ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या व्यक्तीने आपल्या 12 वर्षांच्या मुलीची हत्या केली. घरात रक्ताचे डाग पाहून व मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याला पकडलं. त्याचे हात-पाय दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

हे वाचा - 'रेल्वे स्थानक बॉम्बने उडवणार', उत्तरप्रदेशमध्येही जैश-ए-मोहम्मदची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातल्या कुशमारी पंचायतीच्या उफ्रौलिया गावात ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. एसएचओ संजय कुमार यांनी सांगितलं की, उफ्रौलिया टोला येथील रहिवासी इंदल महतो याला गावकऱ्यांच्या माहितीवरून अटक करण्यात आली आहे. त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतदेहाच्या शोधासाठी शोधपथकातील कुत्रे (Sniffer Dog) तैनात करण्यात आले. आरोपी इंदल महतो हा अनेकदा तंत्र-मंत्रांच्या नादात असायचा, असं सांगण्यात येतं. त्याला आपल्या मुलीही आवडत नव्हत्या. ही बाब समजल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातही ती बातमी वाऱ्यासारखी पसरली.

हे वाचा - MP: OBC आरक्षणाशिवाय निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

घरापासून दूर असलेल्या ठिकाणी मुलीचा मृतदेह जाळल्याचा पत्ता लागला. यावरून संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. स्थानिक लोकांनी सांगितले की, इंदल महतोने देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या मुलीचा बळी दिला असल्याची शक्यता वाटते. त्याच्या घराच्या चौकटीवर रक्ताचे डाग पाण्याने धुतल्यासारखे दिसत असल्याचे लोकांनी सांगितले. आरोपी इंदलच्या पत्नीनेही आपल्या पतीला मुली आवडत नसल्याची कबुली दिली. तो नेहमीच त्यांची लग्न होण्यावरून काळजीत असे. त्यांना मारून टाकेन असंही म्हणायचा. आरोपीला 3 मुली होत्या. मोठ्या मुलीचं लग्न झालं असून धाकटी मुलगी आईसोबत तिच्या आजीच्या घरी राहते. मधली मुलगी सनकी बापासोबत घरात एकटीच होती. त्याने तिलाच मारून टाकलं.

First published:

Tags: Bihar, Crime news, Murder news