Home /News /crime /

डॉक्टरच्या पत्नीने आखला हत्येचा प्लान; जिम ट्रेनरसोबतच्या खासगी फोटोमुळे खळबळ

डॉक्टरच्या पत्नीने आखला हत्येचा प्लान; जिम ट्रेनरसोबतच्या खासगी फोटोमुळे खळबळ

यासाठी महिलेने तिच्या पहिल्या प्रियकराची मदत घेतली आणि सहा जणांनी हत्येची तयारी केली.

    पाटना, 24 सप्टेंबर : पाटन्यात (Patna Crime News) जिम ट्रेनर विक्रम सिंहवर (Gym Trainer Vikram Singh) जीवघेणा हल्ला प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. जिम ट्रेनरवर गोळीबार कांडात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर राजीव कुमार सिंह (Doctor Rajeev Kumar Singh) यांची पत्नी खुशबूने घडवून (Khusboo Singh) आणला होता. विक्रम आणि खुशबू आधीच एकमेकांना ओळखत होते आणि तासन् तास फोनवर बोलत होते. सध्या पोलिसांनी खुशबूसह 6 जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर विक्रम सिंह याला कदमकुआ भागात 18 सप्टेंबर रोजी पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात विक्रमने पोलिसांना सांगितलं की, डॉ राजीव आणि त्यांची पत्नी खुशबू यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. यानंतर पोलिसांनी डॉ राजीव आणि त्यांची पत्नी खुशबू यांची चौकशी केली. मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आलं.(Private PHOTO with gym trainer came in front doctors wife plotted the murder) यानंतर जिम ट्रेनर आणि खुशबूचे फोटो समोर आल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. खुशबूनेच जिम ट्रेनरवर हल्ला केल्याचं उघड झालं आहे. यासाठी खुशबूने आपल्या पहिल्या प्रियकरांशी संपर्क साधला होता. ज्याने एका शूटरचा बंदोबस्त केला. यानंतर खुशबूने त्या शूटरकडून जिम ट्रेनरवर हल्ला घडवून आणला. सांगितलं जात आहे की, खुशबू पाच वर्षांपूर्वी दानापूर येथे राहणाऱ्या मिहीरच्या संपर्कात आली होती. दोघांमध्ये घनिष्ठ संबंध होते. यादरम्यान खुशबूची ओळख जिम ट्रेनर असलेल्या विक्रम सिंह सोबत झाली. हळूहळू खुशबू मिहीरपासून लांब जाऊ लागली व ती विक्रमच्या जवळ आली. हे ही वाचा-साधुने मुलीच्या समोर केली आईची हत्या; कुऱ्हाडीने मारून धडापासून डोकं केलं वेगळं विक्रम आणि खुशबू खूप जवळ असल्याचं समोर आलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे. जानेवारी ते आतापर्यंत विक्रम आणि खूशबू यांनी तब्बल 1100 वेळा फोनवर बोलले आहेत. दोघांचे अनेक फोटोदेखील समोर आले आहेत. मात्र खुशबू आणि विक्रम यांचं नातंही फार काळ चाललं नाही. शेवटी विक्रमपासून अंतर वाढविण्यासाठी तिने त्याच्या हत्येचा प्लान आखला. यासाठी तिने आपला पहिला प्रियकर मिहीरशी संपर्क केला आणि त्याच्या माध्यमातून  अमन नावाच्या एका शूटरला विक्रमच्या हत्येची सुपारी दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime, Crime news, Love, Patna

    पुढील बातम्या