इंदौर, 23 मार्च : मध्यप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. चक्क कॉलेजच्या प्राचार्यांनाच जाळून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान बीएम फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य यांना जिवंत जाळल्याप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातून पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात आरोपीने प्राचार्यांना जिवंत जाळण्यापूर्वी एक मेसेज पाठवला होता. याचे स्क्रीनशॉट पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
गुढी पाडव्यादिवशीच झाला घात, पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू तर 11 गंभीर जखमी
आरोपी आशुतोष श्रीवास्तव याने गेल्या वर्षी फेब्रुवारी ते जून दरम्यान प्राचार्या विमुक्ता शर्मा यांना अनेक मेसेज केले होते. मेसेजमध्ये आरोपीने प्राचार्या माझ्यासोबत चुकीच्या वागत असल्याचे दिसून आले आहे.
प्राचार्य विमुक्ता शर्मा यांना आरोपी आशुतोष श्रीवास्तव याने जिवंत जाळल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये प्राचार्या म्हणाल्या की, दुपारी साडेचारच्या सुमारास कॉलेजमधून घरी जाण्यासाठी मी कारने निघाले होते. तेवढ्यात आशुतोष श्रीवास्तव माझ्या गाडीसमोर आला. मी ब्रेक लावला, त्यानंतर त्याने कारचा दरवाजा उघडला. माझा हात धरून तो मला बाहेर ओढला आणि माझ्यावर पेट्रोल टाकले आणि मला पेटवले.
आरोपीने पोलिसांसमोर संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली असून त्यात त्याने मी बीएम कॉलेजमधील फार्मसीचा माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले आहे. 18 ऑक्टोबर 2022 रोजी कॉलेज व्यवस्थापनाने माझी मार्कशीट दिली नसल्यामुळे मी कॉलेजचे शिक्षक विजय पटेल यांच्यावर वार केले होते. याचीही कबुली आरोपीने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Madhya pradesh