Home /News /crime /

VIDEO - Principal कडून Female teacher ला चपलेने मारहाण; संतापजनक कृत्यामागे धक्कादायक कारण

VIDEO - Principal कडून Female teacher ला चपलेने मारहाण; संतापजनक कृत्यामागे धक्कादायक कारण

सरकारी शाळेत मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चपलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    लखनऊ, 25 जून : शाळेला विद्येचं माहेरघर, ज्ञानाचं मंदिर म्हटलं जातं. पण याच मंदिरात एका मुख्याध्यापकाने चक्क एका शिक्षिकेला चपलेने मारहाण केली आहे. शाळेत शिक्षिकेला चपलेने मारणाऱ्या मुख्याध्यापकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुख्याध्यापकाच्या या संतापजनक कृत्यामागे कारणही धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारी शाळेतील ही घटना आहे (Principal beaten female teacher with shoes). लखीमपूर खेरी जिल्ह्यातील माहुंगू खेडा शाळेत घडलेला हा प्रकार. सराकारी शाळेतील मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चपलेने मारलं. व्हिडीओमध्ये मुख्याध्यापक शिक्षिकेला जोरजोरात मारताना दिसत आहे. यावेळी शाळेतील इतर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थीही उपस्थिती असल्याचं व्हिडीओत दिसतं. हे वाचा - Smartwatch ने FASTag स्कॅन करून होऊ शकते चोरी? VIRAL VIDEO मधील दावा किती खरा? अजित वर्मा असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे. मुख्याध्यापकाने शिक्षिकेला अशी निर्दयीपणे मारहाण करण्याचं कारण म्हणजे तिला शाळेत यायला उशीर झाला. शाळेत 10 मिनिटं उशिरा आल्याने मुख्याध्यापकाने शिक्षिकेला अशी भयंकर शिक्षा दिली. शिक्षणाच्या पवित्र ठिकाणी शिक्षण देणारेच असे गैरवर्तन करतात, तर त्यांच्याकडून शिक्षण घेणारी येणारी पिढी काय शिकणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. हे वाचा - Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA- मूलभूत शिक्षा अधिकारी) लक्ष्मीकांत पांडे यांनी माहिती दिली आहे की, व्हायरल व्हिडिओच्या आधारे मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: School teacher, Uttar pradesh, Viral, Viral videos

    पुढील बातम्या