प्राथमिक शिक्षकाकडे 25 एकर जमीन, 8 प्लॉटसह इतक्या कोटींची संपत्ती! 11 तासांच्या छाप्यानंतर धक्कादायक खुलासा

प्राथमिक शिक्षकाकडे 25 एकर जमीन, 8 प्लॉटसह  इतक्या कोटींची संपत्ती! 11 तासांच्या छाप्यानंतर धक्कादायक खुलासा

1998 पासून प्राथमिक शिक्षक असलेल्या श्रीवास्तव यांनी इतकी संपत्ती कमावली, की अखेर त्यांच्या घरावर लोकायुक्तांना छापा (Raid) मारावा लागला.

  • Share this:

भोपाळ,  17 मार्च : 'वर्षानुवर्षे काम करुनही कमी पगार मिळतो' ही देशातील बहुतेक प्राथमिक शाळेतील शिक्षकांची (Primary School Teacher) तक्रार असते. पंकज श्रीवास्तव हे प्राथमिक शिक्षक याला अपवाद ठरले आहेत. 1998 पासून प्राथमिक शिक्षक असलेल्या श्रीवास्तव यांनी इतकी संपत्ती कमावली की अखेर त्यांच्या घरावर लोकायुक्तांना छापा (Raid) मारावा लागला. तब्बल 11 तास चाललेल्या या छापासत्रात या प्राथमिक शिक्षकाच्या संपत्तीचे समोर आलेले आकडे डोळे पांढरे करणारे आहेत.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळच्या लोकायुक्त पोलिसांनी उत्पन्नापेक्षा अधिक संपतीचा आरोपावरुन पंकज श्रीवास्तव यांच्या घरावर छापा टाकाला. त्यावेळी घरामध्ये मिळालेल्या कागदपत्रांमुळे सर्व अधिकाऱ्यांना क्षणभर त्यांच्या डोळ्यांवरही विश्वास बसला नाही. पंकजने मागच्या 23 वर्षांमध्ये तब्बल 5 कोटींची संपत्ती जमवली आहे. यापैकी फक्त 36 लाख 50 हजार रुपये त्यांनी मासिक पगारातून कमावले आहेत.

श्रीवास्तव यांच्या घरामध्ये सुमारे 11 तास शोध मोहीम सुरू होती. त्यानंतर विशेष टीमने तब्बल 3 सुटकेस भरुन कागदपत्रं नेली आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती जमीन आणि निवासी प्लॉटच्या रजिस्ट्रीचे कागद सापडले आहेत. चेक बुक, पास बुक सह अनेक प्रकारची कागदपत्र विशेष पथकानं जप्त केली आहेत. मंगळवारी विशेष पथकाने एकाच वेळी दोन ठिकाणांवर छापा मारला होता. त्यामध्ये ही सर्व कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. श्रीवास्तव यांच्या लॉकरमधील संपत्तीचा सध्या तपास सुरू आहे.

आरोपीची एकूण 24 ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती उघड झाली आहे. भोपाळमधील मिनाल रेसिडेन्सीमध्ये डुप्लेकस, समरधामध्ये प्लॉट, पिपालियामध्ये एक एकर जमीन, छिंदवाडामध्ये सहा एकर जमीन, बैतूलमध्ये 8 निवासी प्लॉट, 6 दुकानं, बगडोना आणि अन्य 10 गावांमध्ये एकूण 25 एकर शेत जमीन अशा एकूण 5 कोटींच्या संपत्तीचे श्रीवास्तव मालक असल्याची माहिती समोर आली आहे.

BJP MP Ramswaroop Sharma Death Case: भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय )

पंकज श्रीवास्तव गरजू व्यक्तींना चढ्या दराने व्याज देत होता. त्यानंतर त्यांची संपत्ती गहाण ठेवून कर्ज न चुकवल्यास स्वत:च्या नावावर करुन घेत असे. आरोपीनं त्याच्या मित्राच्या मदतीनं श्रीराम आयटीआय संस्थेच्या निर्मितीमध्ये जवळपास 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचबरोबर नागपूरमध्येही त्याचा 10 लाख रुपये किंमतीचा एक प्लॉट असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात श्रीवास्तव याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: News18 Desk
First published: March 17, 2021, 12:51 PM IST

ताज्या बातम्या