महिलेनं पुजाऱ्याला दिला चपलेचा प्रसाद; व्हिडिओ व्हायरल होताच केला आत्महत्येचा प्रयत्न

एका मंदिरातील पुजाऱ्याला महिलेनं चपलेनं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर महिलेनं या घटनेचा व्हिडिओदेखील (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला.

एका मंदिरातील पुजाऱ्याला महिलेनं चपलेनं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर महिलेनं या घटनेचा व्हिडिओदेखील (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला.

  • Share this:
    जयपूर 19 जून : एका मंदिरातील पुजाऱ्याला महिलेनं चपलेनं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर महिलेनं या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पुजाऱ्यानं विष पिऊन आत्महत्या (Suicide Attempt) करण्याचा प्रयत्न केला आहे. घटना राजस्थानच्या अलवारमधील कटीघाटीमधील आहे. या घटनेनंतर पीडित पुजारी पंडित प्रकाश यांचा मुलगा योगेशनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. VIDEO: युवकानं केली दुकानात चोरी; मात्र एका नियमामुळे कोणीही अडवू शकलं नाही योगेश यानं पोलीस ठाण्यात दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, प्रेम प्रकाश दिक्षितसह एक महिला आणि काही लोक मंदिर हडपण्याचा डाव आखत होते. याच कारणामुळे महिलेनं त्याच्या वडिलांना चपलेनं मारहाण करत व्हिडिओ व्हायरल केला. गुरुवारी ही महिला तीन-चार लोकांसोबत कटीघाटी मंदिरात पोहोचली. महिलेनं पुजारी पंडित प्रकाश यांच्यावर दारू पिऊन छेडछाड केल्याचा आरोप केला आणि त्यांना चपलेनं मारहाण केली. यादरम्यान तिथे अनेक लोक उपस्थित होते. यातीलच कोणीतरी महिला मारहाण करत असतानाचा व्हिडिओ शूट केला, यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. मित्रांसोबत वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात; विचित्र घटनेचा VIDEO व्हायरल यादरम्यान महिलेसोबत आलेल्या एका व्यक्तीनं पुजाऱ्याकडे पैशांची मागणी करत त्यांना धमकीही दिली. मंदिराच्या परिसरात बराच वेळ गोंधळ सुरू होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळताच पुजाऱ्यानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुजाऱ्याची प्रकृती बिघडल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
    Published by:Kiran Pharate
    First published: