भोपाळ, 25 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भिंडमध्ये आरोग्य विभागात (Health Department) पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला. येथील जिल्हा रुग्णालयावर आरोप आहे की, रुग्णाने लाच दिली नाही म्हणून एका गर्भवतीला रुग्णालयाबाहेर काढण्यात आलं. ज्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर गर्भवतीची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. नवजातची काळजी न घेतल्यामुळे काही वेळाच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, रुग्णालयातील स्टाफने 5 हजार रुपयांची लाज (Bribe) मागितली होती. जेव्हा महिलेने पैसे देण्यास नकार दिला तर तिला रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आलं. या प्रकरणात सिव्हील सर्जन डॉक्टर अनिल गोयल यांनी सांगितलं की, या प्रकरणात तपास समितीचं गठण करण्यात आलं आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. ही घटना सोमवारी रात्री साधारण 11.30 ते 12 वाजेदरम्यानची आहे. महिला साधारण रात्री 10.30 वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचली. महिला सहा महिन्यांची गर्भवती होती. तिला पोटात वेदना होत होत्या. रुग्णालयातील स्फाने प्रसुत्ती गांभीर्याने घेतली नाही. कुटुंबीयांचा आरोप आहे की, ड्यूटीवर तैनात स्फाटने 5 हजार रुपये मागितले होते. पैसे दिने नाही तर बाहेरून अल्ट्रासाउंड करण्याचं सांगून रुग्णालयाबाहेर जाण्यास सांगण्यात आलं. हे ही वाचा-घरगुती वादाने गाठलं टोक; सासू पुजा करीत असताना सुनेने थेट गोळी झाडून केली हत्या! गर्भवती महिनेच्या सासूने सांगितलं की, त्यांना 5 हजार रुपयांची लाच दिली असती तर त्यांनी उपचार केला असता. जेव्हा सून तपासणी करण्यासाठी रुग्णालयाबाहेर पडली तर वेदना वाढल्या आणि ती रस्त्यावर पडली. येथेच तिने बाळाला जन्म दिला. नवजात बाळावर अंथरण्यासाठी चादरही नव्हती. त्याच्यावर टॉवेल अंथरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Madhya pradesh