मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गर्भवतीला ट्रकने चिरडलं, पोट फाटल्याने नवजात 5 फूट लांब उडालं; बाळ बचावलं, पण आईचा...

गर्भवतीला ट्रकने चिरडलं, पोट फाटल्याने नवजात 5 फूट लांब उडालं; बाळ बचावलं, पण आईचा...

नवव्या महिन्यात गर्भवती आपल्या माहेरच्यांना भेटायला जात होती. या घटनेबद्दल ऐकताच महिलेच्या (Pregnant woman crushed by truck) काकाचाही मृत्यू झाला.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 21 जुलै : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. एका गर्भवती महिलेच्या अंगावरुन ट्रक गेल्याचा भयंकर अपघात घडला. या अपघातात महिलेचं पोट फाटलं. तिच्या पोटातील गर्भ 5 फूट लांब रस्त्यावर जाऊन पडला. ज्या कोणी हे दृश्य पाहिलं त्यांच्या डोळ्यासमोरुन ही घटना दूर होत नाहीये, महिलेच्या शरीराचे तुकडे झाले. यानंतर तातडीने नागरिकांनी बाळाच्या दिशेने धाव घेतला, सुदैवाने बाळ सुखरुप होतं.

गर्भवती महिला आपल्या पतीसह माहेरी जात होती. या घटनेबाबत पतीने सांगितलं की, माझ्या डोळ्यासमोर कामिनीच्या अंगावरुन ट्रक गेला. तडफडून पत्नीचा मृत्यू झाला. यादरम्यान काही अंतरावर माझं बाळ रडत होतं. दुसरीकडे महिलेच्या मृत्यूचं वृत्त ऐकताच तिचे काका कालीचरण यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. महिला आणि तिच्या काकांवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आलं.

पती म्हणाला, पत्नीनेच केला होता हट्ट...

आग्रा जिल्ह्यातील धनौला येथील राहणारा रामू बुधवारी पत्नी कामिनीसोबत बाइकवरुन सासरी जात होता. त्याने सांगितलं की, पत्नी 9 महिन्यांची गर्भवती होती. पत्नीनेच माहेराहून फिरवून आणण्याचा हट्ट केला. माहेरच्यांची आठवण येत असल्याचं म्हणाली होती. बाळ झाल्यानंतर 4 महिने जाता येणार नाही, म्हणून ती माहेरच्यांना भेटायला जात होती.

आमच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती...

रामूने सांगितलं की, मी पत्नीला घेऊन सकाळी 9 वाजता बाईकवरुन निघालो. घरापासून तिचं माहेर 40 किमी अंतरावर आहे. काही वेळानंतर कामिनीने चहाही इच्छा होत असल्याचं सांगितलं. आम्ही एका ढाब्यावर चहा प्यायलो. यानंतर साधारण 5 किमीअंतर पार केलं असेल. तेव्हाच एका भरधाव ट्रकने मागून धडक दिली. यानंतर कामिनी बाईकवरुन खाली पडली. रामूने सांगितलं की, त्याचवेळी ट्रक तिच्या अंगावरुन गेला. माझं बाळ काही अंतरावर उडावं. तेथून जाणाऱ्या काही लोकांनी माझ्या बाळाला घेतलं. यानंतर तातडीने दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र पत्नीचा मृत्यू झाला होता.

First published:

Tags: Road accident, Uttar pardesh