मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दरवाजा उघडताच वहिनी ओरडली, कुटुंबातील 5 जण पडले होते रक्ताच्या थारोळ्यात

दरवाजा उघडताच वहिनी ओरडली, कुटुंबातील 5 जण पडले होते रक्ताच्या थारोळ्यात

एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.

एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.

एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

प्रयागराज, 6 जानेवारी : प्रयागराज येथील युसूफपूर गावातील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात झोपेत असताना विजयशंकर तिवारी त्यांचा मुलगा आणि सून तसंच दोन लहान मुलांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.

विजयशंकर तिवारी यांच्या कुटुंबात सोनू (32) हा सगळ्यात मोठा मुलगा होता. तर पत्याची पत्नी कामिनी उर्फ सोनी (28) आणि दोन लहान मुलं कान्हा (6) और कुंज (3) हे होते. सोनू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे तो सकाळी लवकर उठून कामाला जात असे. मात्र त्या दिवशी सकाळी तिवारी कुटुंबातील कोणीही उठलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारी विजयशंकर तिवारी यांची वहिनी तिवारी यांच्या घरी गेली. मात्र त्या महिलेला समोर थेट 5 मृतदेहच पाहायला मिळाले. हे ह्रदयद्रावक घटना बघून ती महिला जोरात ओरडली.

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, नंतर तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

रक्ताच्या थारोळ्यात असणारं तिवारी कुटुंब पाहून ती शेजारी राहणारी महिला धावत आपल्या घरी गेली आणि ही घटना सांगितली. त्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस त्या घरात गेले तेव्हा दुसऱ्या खोलीत कामिनी आणि तिच्या लहान मुलाचा मृतदेह मिळाला. त्यानंतर आतल्या खोलीत विजयशंकर तिवारी यांचीही हत्या करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंबालाच अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आलं होतं. घटनास्थळी पोलिसांना कुऱ्हाड मिळाली.

पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले मात्र मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचे दूरचे नातेवाईक आल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. अखेर सर्व नातेवाईक आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेनं प्रयागराजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तिवारी कुटुंबातील 5 जणांची हत्या नेमकी कोणी केली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published: