मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब: स्टिंग ऑपरेशन प्रकरणी Tejas More आणि चाचूविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब: स्टिंग ऑपरेशन प्रकरणी Tejas More आणि चाचूविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

125 hrs sting operation case: सव्वाशे तासांच्या स्टिंग ऑपरेशनने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह नंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीही राजीनामा दिला आहे.

125 hrs sting operation case: सव्वाशे तासांच्या स्टिंग ऑपरेशनने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह नंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीही राजीनामा दिला आहे.

125 hrs sting operation case: सव्वाशे तासांच्या स्टिंग ऑपरेशनने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह नंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीही राजीनामा दिला आहे.

पुणे, 17 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen drive bomb) टाकत एकच खळबळ उडवून दिली. या पेन ड्राईव्हमध्ये सव्वाशे तासांचं स्टिंग ऑपरेशन (125 hrs sting operation) आहे. या प्रकरणात आरोप असलेल्या विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांनीही राजीनामा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनंतर प्रवीण चव्हाण यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली होती. आता प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे याच्याविरोधात पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या कार्यालयात घडाळ्यात छुपा कॅमेरा लावून स्टिंग ऑपरेशन तेजस मोरे याने केल्याचा आरोप यापूर्वी प्रवीण चव्हाण यांनी केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण चव्हाण यांनी पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तेजस मोरे आणि त्याचा साथीदार चाचू या दोघांच्याही विरोधात तक्रार दाखल केली आहे. गोपनीयतेचा भंग आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा या प्रकरणी प्रवीण चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.

कोण आहे तेजस मोरे? ज्याच्यावर घडाळ्यातून स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप

प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे (Tejas More) याने स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप केला आहे. अँड प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करण्याचा आरोप असलेला तेजस मोरे हा जळगावातील रहिवासी आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची यामुळे जळगाव कनेक्शन उघड झाले आहे. तेजस मोरे याचे वडील अभियंता होते. तर तेजस हा बांधकाम व्यावसायिक असून गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचे जळगावातील घर बंद आहे. त्याने काहीतरी घोटाळा केला आहे त्यामुळे त्याच्या घरी पोलिस यायचे असं शेजारी-पाजारी सांगतात.

धक्कादायक म्हणजे या तेजसवर जळगाव शहर पोलीस ठाणे 2019 मध्ये रोजी खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती. तसेच या गुन्ह्याची दोषारोपपत्रही जळगाव जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी सांगितले.

वाचा : प्रवीण चव्हाण यांच्या वकील पत्राचा राजीनामा सरकारने स्वीकारला

घडाळ्यात 'तो' छुपा कॅमेरा कोणी लावला? स्टिंग ऑपरेशन कोणी केलं?

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपा कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. भाजपने केवळ एक केविलवाणा प्रयत्न केला आहे. व्हिडीओची मोडतोड करण्यात आली आहे. व्हिडीओ आणि आवाज मॅनिप्युलेट केले आहेत. या स्टिंग ऑपरेशनच्या संदर्भात चौकशी केल्यावर सत्य समोर येईल. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत वकील प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रवीण चव्हाण म्हणाले, माझ्या कार्यालयात तेसज मोरे याचा जामीन अर्ज होता. त्याचा सहभाग यात असण्याची दाट शक्यता आहे. ते घड्याळ त्यानेच इथे आणलं होतं. त्याने एसी बसवून देण्याचं म्हटलं होतं, स्मार्ट टीव्ही लावण्याचं म्हटलं होतं मी नकार दिला होता. त्याचा अटकपूर्व जामीन मी केला होता आणि त्याची फी सुद्धा अद्याप बाकी आहे. तो माझा अशील होता. तेजस मोरे जळगावचा आहे. त्यानेच माझ्या कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी घड्याळ आणून लावले होते. तेजस मोरे जेलमध्ये असताना त्याची ओळख चाचू याच्यासोबत झाली. हा चाचू नावाचा कैदी सुद्धा येथे आल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. तो आता नांदेडला पळून गेला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Devendra Fadnavis, Pune