इंग्लंड, 24 जानेवारी : ब्रिटनमधील माजी मॉडेल ट्रेसी डिक्सन हिने हेलिकॉप्टरचा वापर करुन तिचे सनबाथ घेतानाचे न्यूड व्हिडीओ शूट करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे. असे कृत्य केल्याप्रकरणी ट्रेसी हिने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात दोन कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. हा खटला ट्रेसी हिने जिंकला आहे. ट्रेसी या 54 वर्षांच्या असून तो पोलीस कॉन्सेबल हा पण 54 वर्षांचा आहे. हे दोघं एकाच शाळेत होते.
इंग्लंडमधील यॉर्कशायर येथील ग्लॅमर मॉडेल ट्रेसी डिक्सन ही घराच्या बागेत न्यूड होऊन सनबाथ घेत असताना एद्रियान पोगमोर या पोलीस कर्मचाऱ्याने हेलिकॉप्टरमधून गस्त करताना आकाशातून तिचे व्हिडीओ तयार केले. ही बाब लक्षात येताच या प्रकरणी तिने संबंधित कर्मचाऱ्याविरोधात 2 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. हा खटला ट्रेसी हिने जिंकला आहे. मिरर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ट्रेसीसोबत वाटाघाटी केल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, 2 कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत पोलिसांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हा कर्मचारी शासकीय हेलिकॉप्टरचा वापर स्वतःसाठी करत होता. गुन्हेगारांवर नजर ठेवण्याऐवजी पोलिस कर्मचारी अशी कृत्ये करीत असतील तर ती बाब जनतेसाठी धोकादायक आहेत. पोलिसांनी माझ्या खाजगी जीवनाला हानी पोहोचवली आहे. तसेच या कृत्यामुळे मला मानसिक त्रास देखील झाला आहे. माझ्यासोबत असे कृत्य किती वेळा केले, हे सांगण्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्याने नकार दिला आहे, असे ट्रेसी डिक्सनने म्हणले आहे.
दक्षिण यॉर्कशायर पोलिसांच्या एअर सपोर्ट विभागात पोगमोर कार्यरत होता. यापूर्वी 2 दशलक्ष डॉलर किंमत असलेल्या हेलिकॉप्टरमधील कॅमेराच्या सहाय्याने एका दाम्पत्याचा सेक्स व्हिडीओ तयार केल्याचा आरोप पोगमोर याच्यावर करण्यात आला होता. या हेलिकॉप्टरमधील कॅमेरा इतका शक्तिशाली आहे की हेलिकॉप्टरपासून दोन मैल लांब असलेल्या कारची नंबरप्लेटही यात स्पष्ट दिसते. दक्षिण यॉर्कशायर पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा वापर करुन मी ट्रेसीवर नजर ठेवली होती, अशी कबुली माजी पोलिस कर्मचारी एद्रियान पोगमोर याने दिली आहे.
पोगमोर आणि ट्रेसी यांनी घेतले होते एकाच शाळेत शिक्षण
ट्रेसीने दिलेल्या माहितीनुसार, तिने आणि पोगमोर याने एकाच शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे तो माझा अनेक वर्षांपासून पाठलाग करत असावा. या घटनेनंतर माझा पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. माझ्या खाजगी जीवनात पोलिसांनी केलेला हस्तक्षेप क्लेशदायी आहे, असे ट्रेसीने मिरर वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.