• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • चक्क ठाणेदारालाच कट्टर गुन्हेगाराने दिली लाच; रिव्हर्स सापळा रचून ACB ने अशी केली कारवाई

चक्क ठाणेदारालाच कट्टर गुन्हेगाराने दिली लाच; रिव्हर्स सापळा रचून ACB ने अशी केली कारवाई

कानुन के हात लंबे होते है' असं म्हणतात ते काही उगाच नाही. दुसऱ्यासाठी खड्डा करायला गेलो आणि स्वतःच त्या खड्यात पडलो असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन मध्ये घडला.

  • Share this:
अकोला, 22 मे : 'कानुन के हात लंबे होते है' असं म्हणतात ते काही उगाच नाही. दुसऱ्यासाठी खड्डा करायला गेलो आणि स्वतःच त्या खड्यात पडलो असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन मध्ये घडला. कट्टर गुन्हेगारच यात अडकल्याने दहीहांडा पोलीस निरीक्षक चोरावर मोर झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील दहीहांडा पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांनी रुजू होताच दहीहांडा परीसरात गेल्या काही महिन्यापूर्वी सुरू असलेले अवैद्य धंदे मोडीत काढीत याला चाप बसविला होता. या कारवाई दरम्यान त्यांनी अवैद्य धंदेवाईकांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे अवैद्य धंदेवाईकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले होते. बंद झालेले अवैद्य धंदे सुरु करण्यासाठी अवैद्य धंदेवाईकांनी ऐन-केन प्रकारे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. परंतू पोलीस विभागाच्या 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याला सार्थक ठरवितांना ठाणेदार यांनी अवैद्य धंदेवाईकांचे मनसूबे उधळून लावल्याचा प्रकार नुकताच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीने दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या रिव्हर्स सापळा कारवाईत उघडकीस आला आहे. अवैद्य धंदेवाईकांमधील तिघांनी चक्क ठाणेदारालाच प्रलोभनात्मक 25 हजार रुपयांची लाच देतांना एसीबीने रंगेहाथ पकडले. आरोपींच्या ताब्यात घेण्यात आले. पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हे ही वाचा-बिल भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले हॉस्पिटलमध्ये डांबून,12 तासानंतर सुटका अकोला तालुक्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन येथे काही महिन्यापूर्वी रुजू झालेले ठाणेदार यांनी रुजू होताच दहीहांडा परीसरातील अवैद्य धंद्यांना चांगलाच चाप बसवित अवैद्य धंदेवाईकांना सळो की पळो करून सोडत कारवाईचा धडाका लावला होता. या कारवाईमुळे अवैद्य धंदेवाईकांमध्ये चांगलीच धडकी भरली होती. त्यामुळे अवैद्य धंदे पूर्ववत सुरू करण्यासाठी त्यांनी ऐन-केन प्रकारे प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार त्यांनी चक्क ठाणेदाराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत हप्त्याचे अमिष प्रलोभन दाखविण्याचा सातत्याने प्रयत्न चालविला असतांना कर्तव्याप्रती प्रामाणिक असलेले दहीहांडा ठाणेदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली, असता तक्रारदार लोकसेवक यांचे पो.स्टे. हद्दीत दारू, वरली, मटका असे अवैध धंदा सुरु करण्यासाठी तक्रारदार लोक सेवक यांना 50,000 रु. लाचेचे प्रलोभन देऊन तडजोडीअंती 25,000 रु. लाच प्रलोभन म्हणून लाचेचा पहिला हप्ता देण्याकरीता तिघांनी प्रोत्साहन देऊन, 25000/- रुपये. लाच रक्कम ठरल्या प्रमाणे तक्रारदार लोकसेवक यांना देतांना त्यांना रंगेहाथ पकडले.
Published by:Meenal Gangurde
First published: