तब्बल 6 वर्ष 'त्या' VIDEO ची धमकी देऊन पोलिसाने तिच्यावर गेले अत्याचार, पण अखेर...

तब्बल 6 वर्ष 'त्या' VIDEO ची धमकी देऊन पोलिसाने तिच्यावर गेले अत्याचार, पण अखेर...

विक्रमसिंग बनाफरने आपल्या मोबाइलमध्ये या संबंधाची अश्लील क्लिप बनवली होती.

  • Share this:

नागपूर, 02 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. परंतु, देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एका पोलिसाने घटस्फोट झालेल्या महिलेवर सहा वर्ष अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

नागपूरमध्ये घटस्फोटीत महिलेशी शरीर संबंध जोडल्यानंतर त्याची अश्लील क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिसाला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. विक्रमसिंग बनाफर असं आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे.

पीडित महिला ही अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदामनगरात राहते. 14 वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. तिला एक मुलगी आहे. घरगुती कारणावरून पती-पत्नीत वाद झाल्यानंतर पतीने तिच्यापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर ती आपल्या मुलीसह एकटीच राहत होती.

डोंबिवली हादरलं, 9 वर्षांची मुलगी दारात खेळत होती आणि बापानेच....

आरोपी विक्रमसिंग बनाफर या पोलिसासोबत 6 वर्षांपूर्वी तिची ओळख झाली. बेसा बेलतरोडीतील एका मित्राकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे आले असताना त्यांनी येथे मुक्काम केला. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला गुंगीचा पदार्थ दिला आणि तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.

विक्रमसिंग बनाफरने आपल्या मोबाइलमध्ये  या संबंधाची अश्लील क्लिप बनवली. ती क्लिप दाखवून तो तिला वारंवार ब्लॅकमेल करू लागला. तब्बल 6 वर्षांपासून तो त्या महिलेला ब्लॅकमेल करत होता.

'आज काचा फोडल्या उद्या जाळून टाकेन','वंचित'च्या नेत्याची मजुरांवर दादागिरी,VIDEO

शेवटी पीडित महिलेनं मैत्रिणीचा आधार घेऊन पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.या प्रकरणाचा  पोलीस अधिक तपास करीत आहे.

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक पोलीस उपअधिक्षकांचा वाहन चालक फरार

दरम्यान, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घडलेल्या विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या उपअधिक्षकांच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, हा वाहन चालक पोलीस रेकॉर्डवर फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी अश्विनी पताडे या विवाहित महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विवाहित महिलेच्या माहेरच्यांनी सासरचा लोकांविरोधात चारित्र्याचा संशय घेऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत मयत महिलेचा पती,सासू,सासरे आणि नणंद आणि नंदई विरोधात गुन्हा दाखल केला होता.

विशेष म्हणजे, या संशयित आरोपींमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस उपधीक्षक यांचा वाहन चालक मयत महिलेचा नंदई तुषार दयाळ याचा देखील समावेश आहे.

Published by: sachin Salve
First published: October 2, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading