'नासाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय तुमचा गुन्हा', शक्कल लढवत पोलिसांनी उकललं हत्येचं गूढ

'नासाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय तुमचा गुन्हा', शक्कल लढवत पोलिसांनी उकललं हत्येचं गूढ

दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमचं कृत्य त्या भागात लावलेल्या नासाच्या कॅमेऱ्यात (NASA Camera) कैद झालं आहे. हे ऐकताच दोन्ही आरोपींनी आपणच खून (Murder) केल्याचं कबूल केलं.

  • Share this:

नवी दिल्ली 12 एप्रिल : अनेकदा गुंतागुंतीचे गुन्हे सोडवताना पोलिसांचाही (Police)कस लागतो. गुन्हेगार गुन्ह्याची कबुली देत नाहीत तोपर्यंत पोलिसांना पुढची पावलं उचलता येत नाहीत. त्यानंतर न्यायालयात (Court) खटला दाखल होऊन सुनावणीनंतर गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते. त्यामुळे, गुन्हेगारांकडून (Criminal) गुन्हा (Crime) कबूल करून घेणं ही महत्त्वाची जबाबदारी पोलिसांवर असते. अतिशय हुशार गुन्हेगार पोलिसांना दाद देत नाहीत. अशावेळी पोलिसही अशी काही अफलातून शक्कल लढवतात की भलेभले गुन्हेगारही बरोबर जाळ्यात सापडतात.

सध्या दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) अशाच एका करामतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी चक्क नासाच्या कॅमेऱ्यांनाच (NASA Camera) कामाला लावलं. त्यामुळे दोन अट्टल गुन्हेगारांनी आपला गुन्हा कबूल केला आणि एका अतिशय क्लिष्ट अशा खुनाच्या गुन्ह्याचं गूढ (Murder Mistry) अवघ्या आठवड्याभरात उलगडलं.

मंगोलपुरी भागातील (Mangolpuri Area) एका उद्यानात (Park) 5 एप्रिल रोजी एका पुरुषाचा मृतदेह(Dead body) आढळला होता. ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा दगडानं छिन्न-विछिन्न करण्यात आला होता. या घटनेचा कोणीही साक्षीदार किंवा पुरावादेखील पोलिसांना मिळाला नाही. कोणताही धागा दोरा हातात नसल्यानं हे प्रकरण उलगडणं अतिशय जिकिरीचं होतं, पण पोलिसांनी चिकाटीनं तपास सुरू केला आणि मृत व्यक्तीचं नाव चंद्रभान असून तो मंगोलपुरी भागात राहात होता अशी माहिती त्यांना मिळाली.

प्रदीप आणि राजू या दोन व्यक्तींसोबत त्याला शेवटचं पाहण्यात आल्याचंही पोलिसांनी शोधून काढलं. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, पण दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना काही सीसीटीव्ही फूटेजही (CCTV footage) मिळालं; परंतु त्यात स्पष्टता कमी असल्यानं हे दोन्ही आरोपीच त्यात आहेत हे निश्चित करणं कठीण झालं. पोलिसांची खात्री पटली होती की याच दोघांनी चंद्रभान याचा खून केला आहे, पण त्यांच्याकडून हे सत्य कसं वदवून घ्यायचं हा मोठा प्रश्न होता. मग पोलिसांनी एक अफलातून शक्कल लढवली. या दोघांना पुन्हा एकदा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमचं कृत्य त्या भागात लावलेल्या नासाच्या कॅमेऱ्यात (NASA Camera) कैद झालं आहे. हे ऐकताच दोन्ही आरोपींनी आपणच चंद्रभान याचा खून (Murder) केल्याचं कबूल केलं.

प्रदीप आणि राजू यांना चंद्रभान यानं दारू पिण्यास भाग पाडले होते. तसंच त्यांचा अनेकांसमोर अपमान केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी चंद्रभानचा खून केल्याचं या दोघांनी कबूल केलं. खरं तर नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आणि ती अंतराळयानातून पृथ्वीचे फोटो काढते. पण पोलिसांनी नासा या नावाचा योग्य वापर केला. पोलिसांनी लढवलेल्या अजब युक्तीमुळे अवघ्या आठवड्याभरात एक अतिशय अवघड प्रकरण सोडवण्यात त्यांना यश मिळालं. पोलिसांनी अतिशय हुशारीनं सोडवलेल्या या खुनाच्या प्रकरणाबद्दल इंडिया टीव्हीनं ट्विटरवर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला असून,सोशल मीडियावर पोलिसांचं कौतुक होत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 12, 2021, 5:07 PM IST

ताज्या बातम्या